गुलशन कुमार यांचे बंधू दर्शन कुमार यांचे निधन

मुंबई : टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांचे धाकटे बंधू दर्शन कुमार यांचे शनिवारी (दि. १८ एप्रिल २०२६) दिल्लीत निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे भारतीय संगीत आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. दर्शन कुमार हे जरी प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिले असले, तरीही या उद्योगामध्ये एक दयाळू आणि उदार मनाचे व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती.
आपल्या नि:स्वार्थी योगदानासाठी ओळखल्या जाणा-या दर्शन कुमार यांनी पडद्याआड राहून अनेक कलाकारांना पाठिंबा दिला. भारताच्या संगीत क्षेत्राला महत्त्वपूर्ण आकार देणा-या टी सीरिज कुटुंबाचा ते एक अविभाज्य भाग होते. त्यांच्या निधनानंतर, ज्यांनी त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर जवळून ओळखले होते, अशा अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

गायक मिका सिंग याने इन्स्टाग्रामवर एक भावपूर्ण मेसेज पोस्­ट केला आहे. त्­याने लिहिले, ‘आत्ताच एक अत्यंत दु:खद बातमी समजली की, टी-सीरिजचे मालक दर्शन कुमारजी यांनी आपल्या सुंदर आठवणी मागे ठेवून आपला निरोप घेतला आहे. ते खरोखरच एक महान व्यक्ती होते आणि नेहमीच इतरांना मदत करण्यासाठी तत्पर असत. त्यांनी अनेक गायकांना संधी दिली, त्यांना पाठिंबा दिला आणि असंख्य प्रतिभावंतांना आपली कला सादर करण्याची कवाडे खुली करून दिली. माता राणी त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांना चिरंतन मुक्ती लाभो. भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती.

‘टी-सीरिज’ने भक्तिगीते घराघरांपर्यंत पोहोचवली
१९८३ मध्ये गुलशन कुमार दुआ यांनी ‘सुपर कॅसेट्स इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड’ची स्थापना केली. ही कंपनी पुढे ‘टी-सीरिज’ नावाने ओळखली जाऊ लागली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी भारताच्या संगीत क्षेत्रात एक क्रांती घडवून आणली. त्यांच्या कार्यामुळे संगीत हे सर्वसामान्य लोकांपर्यंत अधिक सहजतेने पोहोचू शकले. गुलशन कुमार यांनी भक्तिगीते आणि चित्रपटांमधील गाणी देशातील कानाकोप-यातील घराघरांपर्यंत पोहोचवली.

दर्शन कुमार यांचे कुटुंबाचा वारसा जपण्­यात योगदान
गुलशन कुमार यांची १२ ऑगस्ट १९९७ रोजी मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात असलेल्या जीतेश्वर महादेव मंदिराबाहेर त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या पश्चात कृष्ण कुमार आणि भूषण कुमार यांनी कंपनीची धुरा सांभाळली. भूषण कुमार यांनी ‘टी-सीरिज’चे रूपांतर एका जागतिक दर्जाच्या मनोरंजन साम्राज्यात केले. आज या कुटुंबाचा वारसा केवळ व्यावसायिक यशापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो त्यांच्या सर्जनशील योगदानातूनही पुढे नेला जात आहे; ज्यामध्ये तुलसी कुमार आणि खुशाली कुमार यांसारख्या कलाकारांनी आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. गुलशन कुमार कुटुंबामध्ये दर्शन कुमार, गोपाल कृष्ण आणि कृष्ण कुमार या बंधूंचा समावेश होतो.

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या...

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
'उद्योगाच्या जागेवर शिकवणीचे दुकान? गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याची इनसाईड स्टोरी!
10:52
Video thumbnail
डॉ. मनोज शिरूरे यांच्या अटकेनंतर CBI ची पुन्हा धाड; पथकाकडून घरच्यांची चौकशी, मोबाईल डेटा रडारवर
01:55
Video thumbnail
CBI च्या कारवाई दरम्यान मोठा खोळंबा, अधिकारी लिफ्टमध्ये अडकल्याने उडाली खळबळ
00:36
Video thumbnail
स्टेबल लाईनवरील रिकाम्या डब्याला आग; नांदेड रेल्वे प्रशासनाची तत्परता, मोठी दुर्घटना टळली
02:08
Video thumbnail
तेलंगणाच्या पोचमपाड धरणाचा नांदेडला फटका! ८ तालुक्यांतील पूरग्रस्त शेतकऱ्यांचा मोर्चा
04:53
Video thumbnail
लातुरात प्रशासकीय सुस्तीविरोधात उद्रेक! भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू
05:16
Video thumbnail
लातुरात 'सीबीआय'चा तिसरा मोठा दणका! तीन तासांच्या चौकशीनंतर डॉ. मनोज शिरुरेंना पुण्यातून अटक
03:12
Video thumbnail
भटक्या कुत्र्यांच्या भीषण हल्ल्यात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी मांडला ठिय्या
02:39
Video thumbnail
लातूर उद्योग भवनमधील प्रा. शिवराज मोटेगावकरचे चार ते पाच प्लॉट्स वादाच्या भोवऱ्यात
03:58
Video thumbnail
धर्माबाद तालुक्यात डिझेलचा तीव्र तुटवडा; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
01:59
Video thumbnail
धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात लातूरमध्ये क्रिकेटचा महाकुंभ; विलासराव देशमुख चॅम्पियनशिप २०२६..
02:56
Video thumbnail
NEET PEPAR LEAK|डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?CBI च्या चौकशीत उघड
01:49
Video thumbnail
BIG BREAKING : लातूरच्या नारायण नगर परिसरात CBI ची धडक;विद्यार्थ्याने नीट पेपर विकत घेतल्याचा संशय
01:48
Video thumbnail
टेंभुर्णीत भीषण आग! फर्निचर, हार्डवेअरसह इलेक्ट्रॉनिक्सची ३ दुकाने खाक; कोट्यवधींचे नुकसान
01:46
Video thumbnail
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल-डिझेलचा प्रचंड तुटवडा; शेतीची कामे रखडल्याने शेतकरी आक्रमक
03:18

Latest news