नवी दिल्ली : केंद्र सरकारने राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक प्रतिष्ठान येथे २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २:३० वाजेपर्यंत अर्धा दिवस बंद ठेवण्याची घोषणा केली आहे.
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह म्हणाले की, लोकांमध्ये असलेला प्रचंड उत्साह पाहता केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये २२ जानेवारीला अर्ध्या दिवसाच्या सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी अनेक राज्यांतील शाळा आणि इतर संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली होती. अयोध्येतील राम मंदिर अभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने अनेक राज्यांनी सुटी जाहीर केली.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम २२ जानेवारी रोजी दुपारी १२.२० वाजता सुरू होईल आणि दुपारी १ वाजता संपेल. २० आणि २१ जानेवारीला राम मंदिर बंद राहणार आहे. २३ जानेवारीपासून रामभक्तांना पुन्हा श्रीरामाचे दर्शन घेता येणार आहे.

