28 C
Latur
Monday, November 11, 2024
Homeक्रीडाधनश्रीकडून अय्यरला बर्थडेच्या हटके शुभेच्छा

धनश्रीकडून अय्यरला बर्थडेच्या हटके शुभेच्छा

नवी दिल्ली : भारतीय मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरने ६ डिसेंबर रोजी आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. अय्यरच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटच्या अनेक दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या. याशिवाय चाहत्यांनीही अय्यरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ६ डिसेंबर रोजी श्रेयस अय्यर सोशल मीडियावर सतत ट्रेंड करत होता. यानिमित्ताने अय्यरची आयपीएल टीम केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्सनेही इन्स्टाग्रामवर एक व्हीडीओ शेअर केला आहे. श्रेयस अय्यरचे नाव अनेकदा भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज यझुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मासोबत जोडले गेले आहे. सोशल मीडियावर यझुवेंद्र चहलबाबत अनेक मीम्स व्हायरल होत आहेत

. यझुवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्याही आल्या होत्या आणि श्रेयस अय्यर हे यामागचे मुख्य कारण असल्याचे मानले जात होते. मात्र या सर्व वृत्ताला कोणत्याही प्रकारची पुष्टी मिळाली नाही.
श्रेयस अय्यरच्या वाढदिवसानिमित्त यझुवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने सोशल मीडियातून शुभेच्छा दिल्या. श्रेयस अय्यरला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिने त्याला चॅम्पियन खेळाडू म्हटले. धनश्री वर्माने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये श्रेयसचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले, श्रेयस अय्यरला वाढदिवसाच्या शुभेच्छा. धनश्री वर्माची पोस्ट सोशल मीडियात चांगलीच व्हायरल झाली.

चहलचे वनडे संघात पुनरागमन
यझुवेंद्र चहलला २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघात स्थान मिळाले नाही. यानंतर यझुवेंद्र चहलचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत संघात पुनरागमन होईल, अशी अपेक्षा होती, मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धही चहलला बाहेर राहावे लागले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा संघ जाहीर झाला आहे. पण यझुवेंद्र चहल हा टी-२० संघाचा भाग नाही. मात्र, वनडे फॉरमॅटमध्ये तो पुन्हा एकदा संघात स्थान पक्के करण्यात यशस्वी झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR