Homeमहाराष्ट्रहर्षवर्धन सदगीर ठरला सातवा डबल महाराष्ट्र केसरी

हर्षवर्धन सदगीर ठरला सातवा डबल महाराष्ट्र केसरी

पुणे : पुण्यातील वाघोली, तालुका हवेली येथे महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना महेंद्र गायकवाड आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात पार पडला. हर्षवर्धन सदगीर याने महेंद्र गायकवाड याला ४-२ असे पराभूत केले. या विजयासह हर्षवर्धन सदगीर सातवा डबल महाराष्ट्र केसरी झाला.

महेंद्र गायकवाड यानं पहिल्या हाफमध्ये १ गुण मिळवत आघाडी घेतली. यानंतर हर्षवर्धन सदगीर याने एक गुण मिळवत बरोबरी केली. पहिला हाफ संपेपर्यंत १-१ असा सामना बरोबरीत होता. दुस-या हाफमध्ये महेंद्र गायकवाड याला एक्टिव्हिटी टास्क देण्यात आला, यात त्याला गुण मिळवता आला नाही. यामुळे हर्षवर्धन सदगीरला एक गुण मिळाला. यानंतर हर्षवर्धन सदगीर याने दोन गुण मिळवले. अशा प्रकारे हर्षवर्धन सदगीर याने ४-१ अशी आघाडी मिळवली. यानंतर हर्षवर्धन सदगीर बाहेर गेल्याने एक गुण महेंद्र गायकवाडला मिळाला.

कुस्तीचा वेळ संपला तेव्हा हर्षवर्धन सदगीर याने ४-२ असा विजय मिळवला. महेंद्र गायकवाड यानं माती विभागातील अंतिम फेरीत सिकंदर शेखचा पराभव केला. तर हर्षवर्धन सदगीर याने जय पाटील याचा गादी विभागातील अंतिम फेरीत केला. यामुळे महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत हर्षवर्धन सदगीर आणि महेंद्र गायकवाड आमने सामने आले.

माती विभागात महेंद्र गायकवाड विजयी
माती विभागाच्या अंतिम फेरीत सोलापूर जिल्ह्यातून महेंद्र गायकवाड आणि हिंगोली जिल्ह्यातून सिकंदर शेख आमने सामने आले होते. या कुस्तीत महेंद्र गायकवाड याने ३-० असा विजय मिळवला. पहिल्या हाफमधील पहिल्या मिनिटातच महेंद्र गायकवाड याने २ गुण मिळवले. यानंतर पुन्हा एकदा महेंद्र गायकवाड याने १ गुण मिळवला. पहिल्या हाफमध्ये महेंद्र गायकवाड ३-० अशा आघाडीवर होता. दुस-या हाफमध्ये महेंद्र गायकवाड याच्या विरोधात सिकंदर शेख याने गुण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, सिकंदर शेख याला गुण मिळवण्यात अपयश आले. यामुळे महेंद्र गायकवाड याने मॅटवर होणा-या अंतिम फेरीत प्रवेश केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR