22.6 C
Latur
Friday, December 6, 2024
Homeमहाराष्ट्रवाहनांची समोरासमोर धडक; ४ ठार

वाहनांची समोरासमोर धडक; ४ ठार

पुणे : पुण्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. पुण्यात फटाक्यांच्या आतषबाजीत झालेल्या धुरामुळे दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाल्याची घटना घडली आहे. ही धडक इतकी भीषण होते की दोन्ही दुचाकींचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. या अपघातात एक जण गंभीररीत्या तर तिघे जण जखमी झाले आहेत. या जखमींना उपचाराकरता वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

पुण्याच्या उरळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी सायंकाळी ही भीषण अपघाताची घटना घडली आहे. शनिवारी सर्वजण दिवाळी पाडवा साजरा करत होते. या दरम्यानच रस्त्यांवर अनेक जण फटाके फोडत होते.या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे रस्त्यावर सर्वदूर धुराचे लोण पसरले होते. या धुरामुळेच दोन दुचाकींची समोरासमोर धडक बसून अपघाताची घटना घडली आहे.

या अपघातात चक्रधर संतोष कांचन, क्षितिज राहुल जाधव, सिद्धांत नवनाथ सातव व प्रतीक संतोष साठे असे चौघे जण जखमी झाले आहेत. या चौघांमधील सिद्धांत सातव याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो गंभीररीत्या जखमी झाला आहे. सध्या या चौघांना वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR