23.4 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeराष्ट्रीयआमदार अपात्रतेवर मंगळवारी सुनावणी

आमदार अपात्रतेवर मंगळवारी सुनावणी

अखेर मुहूर्त सापडला, सुनावणीकडे सर्वांचे लक्ष

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अपात्र प्रकरणाचे सुनावणीला अखेर मुहूर्त सापडला असून, येत्या २४ सप्टेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाने आधीच अजित पवार गटाचे पक्षचिन्ह घड्याळ गोठविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे यावर सर्वोच्च न्यायालयात काय निर्णय होतो, हेही पाहणे महत्त्वाचे आहे.

सर्वोच्च न्यायालयात २ दिवसापूर्वी कोर्टाच्या दैनंदिन कामकाजाच्या यादीत हे प्रकरण २२ ऑक्टोबर रोजी दाखवण्यात आले होते. मात्र, या प्रकरणाबाबत अनेक महिने सुनावणी झालेली नाही. येत्या २४ सप्टेंबर रोजी याबाबत सुनावणी झाल्यास सर्वोच्च न्यायालयाकडून याबाबत निर्देश मिळू शकतात.

शिवसेना पक्ष फुटीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन नेत्यांसोबत गेलेल्या आमदारांबाबत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटातील आमदारांना अपात्र केले नाही. याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. वारंवार याबाबत तारीख पे तारीख पडत असल्याने उद्धव ठाकरे गटाने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र देऊन चिन्हाचा निकाल लागेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह गोठवावे, असे लेखी पत्र दिले होते. यामुळे अजित पवार गटात मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता पसरली होती. आता २४ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते, हे पाहावे लागेल.

राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गोठविणार?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टात निकाल लागत नाही, तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्यावे, अशी मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. शरद पवार गटाने यापूर्वी दोन वेळा हे प्रकरण न्यायालयात मेन्शन केले आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने याबाबत सुनावणी घेतली नव्हती. आता शरद पवारांनी केलेली विनंती मान्य होते का, हे पाहावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR