26.2 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeराष्ट्रीयकोरबा एक्स्प्रेसच्या ४ बोगींना भीषण आग

कोरबा एक्स्प्रेसच्या ४ बोगींना भीषण आग

कोरबा : वृत्तसंस्था
छत्तीसगडमधील कोरबा येथून विशाखापट्टणमला पोहोचलेल्या कोरबा एक्स्प्रेस (१८५१७) ट्रेनच्या बोगीमध्ये अचानक भीषण आग लागली. ही ट्रेन कोरबाहून तिरुमलाला जात होती. ट्रेन स्टेशनवर थांबली असताना स्टेशनच्या चार नंबर प्लॅटफॉर्मवर आगीची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, या आगीच्या घटनेत तीन एसी बोगी पूर्णपणे जळून खाक झाल्या. मात्र, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही. बी ७ बोगीच्या टॉयलेटमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने हा अपघात झाल्याचे रेल्वे अधिका-यांना सुरुवातीला समजले.

बी ७ बोगी पूर्णपणे जळून खाक झाली आहे, तर बी ६ आणि एम १ बोगीलाही आग लागली आहे. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी ट्रेनमध्ये प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR