चारठाणा / प्रतिनिधी
चारठाणा व परिसरात शनिवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून दि.१ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास तब्बल सहा तास मुसळधार पाऊस झाल्याने परिसरातील सर्व नदी व नाल्यांना पुर आला.
दरम्यान संततधार पावसाने शेतीतील सर्व कामे ठप्प झाली आहेत.एकंदरीत सततच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली असुन चारठाणा गावाच्या मध्यभागी असलेल्या गोद्री नदीला पुर आल्याने रात्री उशीरापर्यंत कसबा व पेठ विभागाचा संर्पक तुटला गेला होता.
रविवारी दुपारी दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला तसेच मागच्या चार दिवसापासून कमी अधिक प्रमाणात पावसाची हजेरी कायम आहेच. दरम्यान सततच्या पावसामुळे सोयाबीन,कापूस,तुर आदी पिकांची वाढ देखील खुंटली आहे.मागच्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने परिसरातील एकही तलाव भरला नव्हता परंतु यंदा सततच्या पावसाने चारठाणा परिसरातील सर्व तलाव शंभर टक्के भरले असून तलावांचे पाणी सांडव्यावरून वाहत आहे. दरम्यान चारठाणा गावाच्या मध्यभागी असलेल्या गोद्री नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने रात्री उशीरापर्यंत कसबा व पेठ विभागातील संपर्क तुटला होता. त्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय झाली.