दिसपूर : आसाम विधानसभा निवडणुकांचा निकाला आता हाती आला असून भाजपच्या विजय अश्वाची घोडदौड कायम असल्याचे चित्र आहे. पहिल्या कलापासून ते शेवटच्या कलापर्यंत भाजपने जोरदार मुसंडी मारली असून आसाममध्ये पुन्हा ‘हिंमत राज’ असल्याचे निश्चित झाले आहे.
भाजपने ९५ जागा मिळविल्या असून आघाडी घेत सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरु केली होतीे. तर काँग्रेसला २९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर इतर २ जागांवर अपक्ष आहेत. दरम्यान, भाजपने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी ३० हून अधिक जागा मिळत आसाममध्ये पक्षाची ताकद वाढवली आहे.

