28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeहिंगोलीजनावरांच्या लंपी आजाराचा वसमत मध्ये शिरकाव

जनावरांच्या लंपी आजाराचा वसमत मध्ये शिरकाव

एकमत ऑनलाईन

वसमत : महाराष्ट्रामध्ये थैमान घालत असलेल्या जनावरांच्या लंपी आजाराने वसमतमध्ये सुद्धा शिरकाव केला आहे. वसमत शहरातील शुक्रवार पेठ येथील एका पशुपालकाच्या बैलास लंपी सदृश्य गाठी आल्यामुळे त्यांनी सोमवारी या बैलास शासकीय पशु दवाखान्यामध्ये आणले असता पशुवैद्यकीय अधिकारी यांनी खात्री केली की बैलास लंपी आजाराची लागण झाली असल्याचे सांगितले.

त्यामुळे त्या बैलास अन्य जनावरांसोबत न ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत वसमत शहरांमध्ये लंपि आजाराची पहिलीच केस असल्यामुळे वसमत शहरातील आणि पाच किलोमीटरच्या आतील सर्व गावातील जनावरांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.कौरेवार यांनी पशुपालकांसाठी जनावरांमध्ये दिसणारा लंपी आजार हा जीवघेणा आजार नाही त्यामुळे पशुपालकांनी न घाबरता जनावरांमध्ये जर लंपी आजाराची लक्षणे दिसली तर थेट पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांना घेऊन येण्याचे आवाहन केले आहे.

हा संसर्गजन्य रोग नसल्यामुळे जनावरांपासून जनावरांपुरताच हा आजार असल्यामुळे मनुष्यबळावर याचा काही परिणाम होणार नाही त्यामुळे त्यांनी आपल्या पशुची निगराणी करावी आणि लसीकरणासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात आपल्या जनावरांना तात्काळ घेऊन यावे वसमत तालुक्यासाठी १२००० लस्सींचा साठा उपलब्ध झाला असून २००० लसी वसमत साठी उपलब्ध असल्याचे सुद्धा सांगितले आहे.

जोपर्यंत शंभर टक्के लसीकरण जनावरांना होत नाही तोपर्यंत वसमत येथिल वसमत येथील पशुवैद्यकीय दवाखाना हा सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू राहणार आहे त्यामुळे वसमत शहरातील पशुपालकांनी आपली जनावरे या वेळेत लसीकरणासाठी घेऊन येण्याचे अवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कौरेवार यांनी केले आहे.

वसमत तालुक्यासाठी भरपूर लसी उपलब्ध झाल्या असून पशुपालकांनी खाजगी मध्ये आपल्या जनावरांना कोणत्याही प्रकारची लस देऊ नये पशू दवाखान्यातच आपल्या जनावरांना लस द्यावी असे सांगितले आहे.

शहरातील मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून शहरातील मुख्य रस्त्यावर जागोजागी मोकाट जनावरे फिरताना दिसत आहेत वसमतमधील मोकाट जनावरांना जर या लंपी रोगाची लागण झाली तर त्यांच्या लसीकरणासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे पशुवैद्यकीय सहाय्यक आयुक्त वसमत यांनी सांगितले त्यामुळे दिनांक १५ सप्टेंबर रोजी वसमत नगरपरिषद कार्यालय यांना मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा यासाठी पत्र दिल्याचे सांगितले आहे आज पर्यंत तरी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त झाला नसल्याचे स्पष्ट चित्र वसमत मध्ये आहे.

पशुपालकांनी आपल्या पशूंची काळजी घ्यावी हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळे तो फक्त जनावरांपूर्ता मर्यादित आहे मनुष्य जातीवर यांचा कोणताही प्रादुर्भाव होणार नाही त्यामुळे आपल्या पशुला जर ह्या आजाराची लक्षणे दिसली तर त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी अन्य जनावरांमध्ये त्याला मिसळू नये हा आजार जीवघेणा नाही त्यामुळे पशुपालकांनी न घाबरता कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये व आपल्या पशूंचे लसीकारण करून घ्यावे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या