31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeहिंगोलीजिल्ह्यात आणखी १० जणांना कोरोनाची लागण

जिल्ह्यात आणखी १० जणांना कोरोनाची लागण

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्ह्यात मंगळवारी १० कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत़ तर १३ रुग्णांना बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे़ आजपर्यंत एकूण ५८५ रुग्ण झाले असून त्यापैकी ३८५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे़ आज घडीला एकूण १९४ रुग्णावर उपचार चालू आहेत.

मंगळवारी दहा रुग्ण आढळून आले आहेत़ यामध्ये हिंगोली शहरातील महादेववाडी १, पेन्शनपुरा १, तोफखाना २, श्रीनगर १, यशवंत नगर १, गाडीपुरा १, अष्टविनायक नगर १, हिंगोली तालुक्यातील सवड १, मंगळवारपेठ वसमत येथे १ रुग्ण आढळून आला आहे़ आज रोजी १३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे़ यामध्ये ५ रुग्ण (३ बालाजी नगर, २ बस स्टॅन्ड जवळ) हे कोरोना केअर सेंटर सेनगाव मधील आहेत़ कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथील ३ रुग्ण (३ आखाडा बाळापुर), कोरोना केअर सेंटर वसमत येथील २ रुग्ण (१ गुलशन नगर, १ स्वानंद कॉलनी नांदेडमधून डिस्चार्ज झाले आहेत) आणि आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली मधून ३ रुग्ण (१ पलटन, २ बस स्टॅन्ड जवळ सेनगाव) यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्हयातंर्गत आयसोलेशन वार्ड, सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वारंंनटाईन सेंटर अंतर्गत एकुन ७२०१ व्यक्तींना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी ६४३९ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ६५८९ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीला ५८९ व्यक्ती भरती आहेत आणि आज रोजी २०९ अहवाल येणे प्रलंबित आहे. ६ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. आयसोलेशन वार्ड जिल्हा सामान्य रुणालय हिंगोली येथे भरती असलेल्या रुग्णांपैकी १४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना आॅक्सीजन चालु आहे़ एका २८ वर्ष कोविड रुग्णाची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्याला बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.

सोमवारी आढळले १७ रुग्ण
सोमवारी आढळूण आलेल्या रुग्णांमध्ये गाडीपुरा, हिंगोली येथील ३ व्यक्ती, मेहराज कॉर्नर हिंगोली येथील १ व्यक्ती, आझम कॉलनी हिंगोली येथील १ व्यक्ती, मंगळवारा, हिंगोली येथील ३ व्यक्ती, एस.आर.पी.एफ. हिंगोली येथील ४ व्यक्ती, श्रीनगर वसमत येथील ३ व्यक्ती, सोमवार पेठ, वसमत येथील १ व्यक्ती आणि पठाण मोहल्ला वसमत येथील १ व्यक्ती असे एकुण १७ जणांना कोविड-१९ ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत असल्याने नागरीकांत चिंतेचे वातावरण आहे.

Read More  नगरपालिका कर्मचा-यांचे काळ्या फिती लावून काम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या