28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeहिंगोलीयेलकी सशस्त्र सीमा बलात ११० जवान कोरोना बाधीत

येलकी सशस्त्र सीमा बलात ११० जवान कोरोना बाधीत

एकमत ऑनलाईन

आखाडा बाळापुर (शफी डोंगरगावकर) : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील येलकी येथील सशस्त्र सीमा बल या वाहिनी मध्ये प्रशिक्षणासाठी आलेल्या ३१२ जवान पैकी ११० प्रशिक्षणार्थी जवानांचा अहवाल करोनन बाधीत आला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शेख रौफ व वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर सावंत यांनी दिल्यामुळे आखाडा बाळापूर परिसरात खळबळ उडाली असून आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आखाडा बाळापुर पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या येलकी शिवारामध्ये सशस्त्र सीमा बलाचे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे या सीमा बलाच्या ईमारतीत मध्ये ३१२ जवान प्रशिक्षण घेण्यासाठी आले आहेत या जवानांची दिनांक २७ एप्रिल रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शेख रौफ यांच्या मार्गदर्शनाखाली आखाडा बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ज्ञानेश्वर सावंत, डॉ.अजित धोंडे, समुदाय अधिकारी डॉ. कृष्णा जगदाळे, डॉ.शिवाजी माने. डॉ. नरेंद्र थोरात, डॉ. शरद पाटील यांनी सदरील ठिकाणी जाऊन ३१२ जवानांची आर टी पी सी आर चाचणी केली त्यापैकी २८२ जवानांचा आरटीपीसी अहवाल दिनांक ३० एप्रिल रोजी आला असून त्यामध्ये ११० प्रशीनार्थी जवान करोना बाधीत असल्याचे आढळून आले आहे.

तर ते ३० जवानांचा अहवाल प्रलंबीत असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान ११० प्रशिक्षणार्थी जवानांना कळमनुरी येथील शासकीय वस्तीग्रहामध्ये उपचारासाठी आज दिनांक ३० एप्रिल रोजी दाखल करण्यात आल्याची आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले आहे. आता ते ३० जणांचा अहवाल काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गंगाखेडला कच्चा बंधारा तोडून पाणी सोडले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या