29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeहिंगोलीहिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे ११३ नवे रूग्ण; दोघांचा मृत्यू

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे ११३ नवे रूग्ण; दोघांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असून, शनिवारी ११३ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. तर दोन रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. तर ११५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली. मागील पंधरवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. दरदिवशी रूग्णसंख्या वाढू लागली असून, गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे. आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनातील सर्वच विभाग कोरोना रोखण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहेत.

हिंगोली जिल्ह्यात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या तपासणीत ११३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये रॅपीड अ‍ॅन्टजन तपासणीत ६३ कोरोनाचे रूग्ण आढळून आले तर आरटीपीसीआर चाचणीमध्ये ५० जण पॉझिटीव्ह आले. रॅपीड अ‍ॅन्टीजन तपासणीत हिंगोली परिसरात १३९ जणांची तपासणी केली असता त्यात २५ तर आरटीपीसीआर चाचणीत ४ जणांना कोरोना झाल्याचे पुढे आले. कळमनुरी परिसरात ११३ जणांच्या तपासणीत १२ तर तर आरटीपीसीआर चाचणीत ३३ जण कोरोना पॉझिटीव्ह आले. वसमत परिसरात १२५ जणांची तपासणी केली असता २१ तर आरटीपीसीआरमध्ये ७ जण कोरोनाग्रस्त आढळून आले.

तर औंढा परिसरात ३७ पैकी ५ तर आरटीपीसीआरमध्ये २ जणांना कोरोना झाल्याचे आढळून आले. तर सेनगाव परिसरात १४ जणांची तपासणी केली असता या ठिकाणी एकही व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळून आला नाही. परंतु, आरटीपीसीआर चाचणीत ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी ११५ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. कोरोनामुळे शनिवारी वसमत येथील मुसाफीर मोहल्ला येक्षील ५० वर्षीय महिला रूग्णाचा आणि हिंगोली शहरातील रिसाला बाजार भागातील ४५ वर्षीय पुरूष अशा दोन रूग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात आजपर्यंत ८१ रूग्णांचा कोरोनाने मृत्यू
जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून, २७ मार्चपर्यंत मागील वर्षभरात ८१ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारीही दोघा जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. तर आत्तापर्यंत ५ हजार ९९२ जणांना कोरोनाची लागण झाली. तर ५ हजार २८८ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून, सध्या ६२३ कोरोनाग्रस्त रूग्णांवर जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. या रूग्णांपैकी ५६ रूग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यांना ऑक्सीजन लावण्यात आला आहे. त्यातील ६ रूग्ण अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे.

डिजिटल विनोद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या