27 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home हिंगोली जिल्ह्यात १५०० खाटांचे १८ कोव्हीड केअर सेंटर

जिल्ह्यात १५०० खाटांचे १८ कोव्हीड केअर सेंटर

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जगभरात कोरोनाचे थैमान सुरु असतांना जिल्ह्यातील आरोग्य यंत्रना अधिक सक्षम झाली असुन १ हजार ५०० खाटाचे १८ कोव्हिड सेंटर उभारले असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्य दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड बोलत होत्या. यावेळी आमदार सर्वश्री तान्हाजी मुटकुळे, राजु नवघरे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक मंचक इप्पर, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोना महामारी विरुध्द आपण सर्वजण समर्थपणे लढा देत असून याचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पहिल्या दिवसापासून अविरत कार्यरत असल्याचे सांगत पालकमंत्री गायकवाड म्हणाल्या की, संभाव्य रुग्णवाढ विचारात घेऊन जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.

जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी ३२० खाटांचे ०२ डेडीकेटेड हॉस्पीटल, ३५० खाटांचे ६ डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, तर १५०० खाटांचे १८ कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहेत. बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या सुमारे ५० हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली असून अ‍ॅन्टीजेन टेस्टद्वारे जिल्ह्यातील १ लाख नागरिकांची तपासणी करण्याचे नियोजन असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती अरुणा संगेवार, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, सह जिल्हा निबंधक संजय पाटील, सहायक आयुक्त भाऊराव चव्हाण, उपविभागीय वन अधिकारी कामाजी पवार, नियोजन अधिकारी किरण गिरगावकर यांच्यासह स्वातंर्त्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, यांची उपस्थिती होती.

सुशांतसिंग प्रकरणी दररोज वेगळे वळण; सीसीटीव्हीतील ही महिला कोण?

कोव्हीड उपाययोजनेसाठी ५ कोटी ४३ लाख
राज्य शासनाने ‘शिवभोजन’ ही योजना सुरु केली असून या योजनेतंर्गत जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या कालावधीत ९ केंद्रामार्फत सुमारे २ लाखाहून अधिक शिवभोजन थाळींचे वितरण करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील १ लाख २६ हजारहून अधिक शिधापत्रिकाधारकांना ७ हजार २०४ मेट्रीक टन अन्न-धान्याचे वितरण करण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोविड-१९ विषाणूच्या विविध उपाययोजनांसाठी ५ कोटी ४३ लाख निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या