22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeहिंगोलीहिंगोली जिल्ह्यात कोविड-१९ चे नवीन ३२३ रुग्ण ; तर २८२ रुग्ण बरे...

हिंगोली जिल्ह्यात कोविड-१९ चे नवीन ३२३ रुग्ण ; तर २८२ रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

एकमत ऑनलाईन

हिंगोली, (जिमाका) दि. २४ : जिल्ह्यात ३२३ नवीन कोविड-१९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर २८, वसमत परिसर ३ व्यक्ती, कळमनुरी परिसर १६ व्यक्ती, सेनगाव परिसर ९ व्यक्ती व औंढा परिसर १७ व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर ६१ व्यक्ती, वसमत परिसर ३९ व्यक्ती, औंढा परिसर १३ व्यक्ती, कळमनुरी परिसर १०५ व्यक्ती व सेनगाव परिसर ३२ व्यक्ती असे एकूण ३२३ कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज २८२ कोविड-1१९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे .

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-१९ रुग्णांपैकी ४१० रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर ४६ कोविड-१९ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण ४५६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-१९ चे एकूण ११ हजार ५६८ रुग्ण झाले असून, त्यापैकी ९ हजार ९०० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण १४८२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-१९ मुळे जिल्ह्यात आतापर्यंत १८६ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

कोरोना वाढताच श्रीमंतांचे देशातून पलायन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या