31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeहिंगोलीकामठा फाट्यावरील ३५ राजस्थानी कुटुंब घराकडे रवाना

कामठा फाट्यावरील ३५ राजस्थानी कुटुंब घराकडे रवाना

एकमत ऑनलाईन

आखाडा बाळापूर (शफी डोंगरगावकर) : कामठा फाटा येथे मागील काही महिन्यापासून वास्तव्यास असलेल्या राजस्थान राज्यातील भटके-विमुक्तजमातीचे लोक हे एका खून प्रकरणात तपासणीतून अडकून पडले होते. पोलीस प्रशासन त्यांना त्यांच्या राज्यात घरी जाऊ देत नव्हती त्रस्त झालेल्या कुटुंबियांना राष्ट्रवादीचे ठाकूरंिसग बावरी यांनी प्रयत्न करून त्या सर्व कुटुंबीयांना आपल्या मूळ गावी पाठविण्यात आले आहे. आखाडा बाळापुर पोलीस स्थानक अंतर्गत असलेल्या कामठा फाटा येथील गायरान जमीनीवर लोकांचे मनोरंजन करून उपजीविका करणा-या ३५ कुटुंब वास्तव्यास होती याच कुटुंबातील एका मुलीचे काही महिन्यापूर्वी अपहरण करून खून करण्यात आले होते.

पोलीस तपासणी चालू आहे.म्हणुन या कुटुंबीयांना त्यांच्या राहत्या मुळ घरी राजस्थान राज्यात पोलीस जाऊ देत नव्हती राष्ट्रवादी काँग्रेस भ.वि.ज.स. चेप्रदेश उपाध्यक्ष ठाकूरसिंग बावरी यांनी हिंगोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश कलासागर अतिरिक्त पोलिस अधीक्षक यातिष देशमुख पोलीस स्थानकाचे सहायकपोलीस निरीक्षक रवि हुंडेकर ,पोलीस उपनिरीक्षक मुपडे यांच्याशी चर्चा करून त्या कुटुंबीयांना त्यांच्या राहत्या गावी राजस्थानात पाठवण्यात आले आहे.आखाडाबाळापुर पोलीसांनी या सर्व कुटुंबातील प्रमुखांना नोटीस देऊन तपासणी कामी सहकार्य करावे असे नमुद केले आहे.

यापूर्वी या कुटुंबीयांना मदत फेरी तयार करून मदत करण्यात आली होती. ते कुटुंबियाकडून जाण्यासाठी स्वत:च्या गाड्या असल्यामुळे त्या गाड्यांना तब्बल भरपूर डिझेल लागणार होते तेव्हा आखाडाबाळापुर परिसरातून यांनी बावरी यांनी आर्थिक मदत तयार कली त्यामध्ये कृष्णराव जरोडेकर २००० ,अलिशा शहाबाज कुरेशी १५००,व्हि.एस. सूर्यवंशी १०००, विजय पाटील बोंढारे १०००, दीपक दुर्गे १००० , अभिजीत देशमुख,प्रा. मिनानाथ गोमचाळे १०००, बी बी भगत १०००, ओम ठमके१०००,ठाकूरंिसग बावरी १००० असे एकूण १७०००हजार रुपये मदत निधी जमा करण्यात येऊन त्यांच्या गाड्यांमध्ये डिझेल टाकून त्या गाड्या रवाना करण्यात आल्या आहेत.सर्वच कुटुंबातील व्यक्तीच्मा तोंडावर हास्य फुलुन बावरी यांचे आभार मानले.

परभणीतील रस्त्यांवर शुकशुकाट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या