19.1 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home हिंगोली हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 48 रुग्ण

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 48 रुग्ण

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्ह्यात 48 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी आज दिली आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 4 व्यक्ती आणि सेनगाव परिसर एक व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 26 व्यक्ती, वसमत परिसरात 12, औंढा परिसर एक व्यक्ती तर सेनगाव परिसर 4 व्यक्ती असे एकूण 48 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर 44 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आज दोन कोव्हिड -19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 23 रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 7 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 30 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 2 हजार 118 रुग्ण झाले असून, त्यापैकी 1 हजार 619 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 473 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोवीड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 26 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी कळविले आहे.

कळंब तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक निवडीचा घोळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या