27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeहिंगोलीहिंगोलीत तब्बल ५६ कोरोना पॉझिटीव्ह !

हिंगोलीत तब्बल ५६ कोरोना पॉझिटीव्ह !

एकमत ऑनलाईन

हिंगोली : हिंगोली शहरात कोरोनाचा दिवसेंदिवस धोका वाढत असुन आज चार महिन्यातील सर्वात मोठा म्हणजेच ५६ जणांना कोरोनाची लागण झाली. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २११ वर पोचला आहे.

हिंगोली शहरात पहिल्यांदाच कोरोनाने विक्रमी उच्चांक गाठला दिवसभरात ५६ रुग्ण आढळले. यात शहरातील देवगल्ली भागात एक, जिल्हा परिषद निवासस्थान असलेल्या भागात तीन तोफखाना भागात एक, संमती नगर कॉलनीत एक, मंगळवारा भागात एक सवड येथे 1 तर एसआरपीएफचे तेहतीस जवान कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले. यासोबत जिल्ह्यात वसमत शहरात अँटिजन तपासणीत ८ रुग्ण आढळले. यात बँक कॉलनी चार, मंगळवार पेठ वसमत येथे एक, वसमत येथील स्त्री रुग्णालयात एक, पतंगे कॉलेज समोर भागात एक रुग्ण आढळला.

याच बरोबर कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथे एक कळमनुरी शहरातील बुरसे गल्लीत एक वसमत तालुक्यातील चोंडी स्टेशन येथे एक वसमत शहरातील जवाहर कॉलनी एक असे एकूण ५६ रुग्ण आढळले हिंगोली शहरात आयसोलेशन वार्डात उपचार घेत असलेल्या एका ८० वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान दरम्यान पाच रुग्ण कोरोनाने बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या २११ वर पोहोचली आहे. आजपर्यंत ६५४ कोरोना बाधित आढळले. यापैकी ४३५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सामान्य रुग्णालयात २१ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी दिली.

Read More  लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी ६ मृत्यू

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या