23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeहिंगोलीबलात्कार प्रकरणी भाजपच्या माजी नगराध्यक्षा सह मुलावर गुन्हा दाखल

बलात्कार प्रकरणी भाजपच्या माजी नगराध्यक्षा सह मुलावर गुन्हा दाखल

एकमत ऑनलाईन

हिंगोली : भाजपच्या माजी नगराध्यक्षाच्या पुत्राणे हिंगोली शहरातील विवाहितेवर बलात्कार केल्या प्रकरणी माजी नगराध्यक्षा सह पिढीत महिलेने जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पिता-पुत्रावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

वंजारवाडा येथे राहणा-या रोहण बाबाराव बांगर याने एका 22 वर्षीय विवाहितेवर खिशातील तोंडावर रूमाल दाबुन बळजबरीने बलात्कार केला व त्याचे वडील भाजपचे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांनी झालेली घटना कोणाला सांगु नकोस, आमची बदनामी होईल कोणाला सांगितले तर तुला जिवे मारल्याशिवाय राहणार नाही असे धमकावल्या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात बाप-लेकाविरूध्द पिढीत विवाहित महिलेच्या तक्रारीवरून कलम 376, 506, 34 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि.13 जानेवारी 2021 ते दि.20 जानेवारी 2022 या कालावधीत घडल्याची फिर्यादीत नमुद करण्यात आली आहे. पिढीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पत्नी सासरी नांदवायला घेउन येईल या आशेमुळे या प्रकरणाची मी वाचता केली नाही. पण पती मला सासरी घेउन जाण्यासाठी आले नाही, म्हणुन गुन्हा दाखल करण्याचे नमुद करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक एस.एस.आमले यांनी भेट दिली असुन, पुढील तपास पोलिस उपविभागीय देशमुख हे करीत आहेत. या प्रकरणामुळे हिंगोलीत तर्क वितर्क लावले जात आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या