26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeहिंगोलीहिंगोली-औंढा मार्गावर अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

हिंगोली-औंढा मार्गावर अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

एकमत ऑनलाईन

हिंगोली : हिंगोली – औंढा महामार्गावर लिंबाळा औद्योगिक वसाहत परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ३0) रात्री साडेआठ वाजता घडली. श्यामराव घुले (५२) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्डी (ता. औंढा नागनाथ) येथील श्यामराव घुले सोमवारी त्यांच्या दुचाकीवर बसून नरसी नामदेव येथे आले होते. काम आटोपून ते रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास परत गावाकडे निघाले होते. त्यावेळी हिंगोली -औंढा नागनाथ मार्गावर लिंबाळा औद्योगिक वसाहतीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात घुले यांच्या डोक्याला व हाता पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातात डोक्याला अधिक मार लागल्याने घुले यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आर.एन. मळघने, जमादार संतोष वाठोरे, अशोक धामणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घुले यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला. या प्रकरणी मंगळवारी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या