28 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeहिंगोलीआई- वडिलांना भेटण्यासाठी चाललेल्या पोलिसाचा अपघाती मृत्यू

आई- वडिलांना भेटण्यासाठी चाललेल्या पोलिसाचा अपघाती मृत्यू

एकमत ऑनलाईन

हिंगोली : लॉकडाऊनमुळे चार महिन्यापेक्षा अधिक काळ आई-वडिलांची भेट न होऊ शकल्यामुळे रजा मिळताच भेटीसाठी थेट अमरावती ते लातूर असा दुचाकी प्रवास करत निघालेल्या पोलीस कर्मचा-याचा हिंगोली शहराजवळील वळण रस्त्यावर आज बुधवारी सकाळी आठच्या सुमारास ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला.

हनुमंत विष्णू मुर्टे वय २७ वर्ष, मूळ रा. मुरुदड, जिल्हा लातूर हे अमरावती ग्रामीण पोलिस विभागात पोलीस कर्मचारी पदावर २०१८ पासून कार्यरत होते. लॉकडाऊन दरम्यान कर्तव्य बजावत असल्यामुळे त्यांना गावाकडे जाऊन आई-वडिलांची भेट घेता आली नव्हती.

अखेर वरिष्ठांनी नुकतीच त्यांची पंधरा दिवसांची अर्जित रजा मंजूर केल्यानंतर इतर वाहने उपलब्ध नसल्याने त्यांनी अमरावती ते लातूर असा दुचाकी प्रवास करण्याचे धाडस केले. हिंगोली बाहेरून जाणाºया वळण रस्त्यावर सकाळी आठच्या सुमारास हनुमंत हे दुचाकी क्रमांक एम एच २४ बीएफ ४५०३ वरून जात असताना ट्रकने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Read More  धान्या अभावी कुटूंबावर उपासमारीची वेळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या