29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeहिंगोलीबेजबाबदार नागरिक, व्यापा-यांवर कारवाई

बेजबाबदार नागरिक, व्यापा-यांवर कारवाई

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून कोरोनाच्या रूग्णात मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमिवर प्रशासनाकडून सर्व उपाय योजना राबविण्यात येत असल्यातरी काही नागरिक मात्र अजुनही बेजबाबदारपणे वागत आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरणे, मास्क न घालणे, सामाजिक अंतर न पाळणे असे प्रकार सुरूच असल्याने नगर पालिकेच्या पथकाने बुधवारी (दि.२४) कार्यवाहीचा बडगा उगारला. यामध्ये ६७ नागरिकांना प्रत्येकी २०० रूपये प्रमाणे १३ हजार ४०० रूपयांचा दंड लावण्यात आला.

हिंगोली जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज शंभराच्या जवळपास पुढे येत आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह नगर पालिका प्रशासनानही सतर्क झाले असून, कोरोना रोखण्यासाठी आवश्यक ते उपाय योजना राबविण्याचे काम सुरू आहे. शहरात रात्री ७ ते सकाळी ७ दरम्यान संचारबंदीही लागू आहे. तर दिवसा काही निर्बंध घालून देत बाजारपेठ सुरू ठेवण्यात येत आहे. परंतु, बाजारात वावरताना आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमाची पायमल्ली करीत अनेकजण बेजबाबदार पणे वागत आहेत. न.प.कडून अनेक वेळा सूचनाही करण्यात आल्या. त्याकडेही नागरिकांकडून दुर्लक्ष केल्या जात असल्याने बुधवारी थेट दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. हिंगोलीतील नांदेड नाका, इंदिरा गांधी चौक, महात्मा गाांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, जवाहर रोड, पोस्ट ऑफीस रोड, नवा मोंढा भाग आदी भागात न.प.च्या पथकाने कार्यवाही केली. यात बेजबाबदारपणे वागणा-या ६७ नागरिकांना १३ हजार ४०० रूपयांचा दंड लावण्यात आला. ही कार्यवाही न.प.चे पंडीत मस्के, प्रविण चव्हाण, नागेश नरवाडे, निलपत्रवार आदींनी केली.

‘त्या’ व्यवसायिकांची दुकाने केली बंद
शहरातील बाजारपेठ प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधानुसार सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहत आहे. तर काही दुकाने सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. परंतु, व्यवसायीकांनी स्वत: तसेच प्रतिष्ठाणावर काम करणा-या कामगारांची कोरोना तपासणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या संदर्भात नगर पालिका प्रशासनाकडून वारंवार सूचनाही करण्यात येत आहेत. परंतु, त्या उपरही काही व्यवसायिक कोरोना तपासणी करून घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे पुढे आल्याने बुधवारी न.प.च्या पथकाने दंडात्मक कार्यवाही करीत सदर दुकाने बंद करण्यास लावली. नगर पालिका संकूल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, जवाहर रोड, महात्मा गांधी चौक, सराफा लाईन, मेडीकल लाईन, फुल मंडई, अण्णाभाऊ साठे वाचनालय परिसर आदी भागातील व्यवसायिकांकडे जावून कोरोना तपासणी केली की नाही, याची तपासणी करण्यात आली. त्याच बरोबर दुकानामध्ये विनामास्क काम करणा-यांवरही कार्यवाही केली. यामध्ये १० दुकानदारांना ४ हजाराचा दंड लावण्यात आला.

अनोख्या माध्यमातून गुरूजींकडून पर्यावरण संवर्धन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या