23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeहिंगोलीअ‍ॅड. राजीव सातव कोरोनामुक्त; चाहत्यांमध्ये आनंद

अ‍ॅड. राजीव सातव कोरोनामुक्त; चाहत्यांमध्ये आनंद

एकमत ऑनलाईन

हिंगोली : राज्यसभेचे खासदार अ‍ॅड. राजीव सातव यांनी कोरोनावर मात केली आहे. काही दिवसांपुर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु होते. सोमवारी आलेल्या दुसºया कोरोना चाचणीच्या अहवालात त्यांच्या तब्येतीमध्ये मोठी सुधारणा झाली असून कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली आहे. सातव यांना आता नॉन कोविड वार्डात हलविले असून त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.

कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर ते पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत होते. सुरुवातीला कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर गेल्या काही दिवसांत ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत होते. पुण्यासह मुंबईचेही डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत होते. सोमवारी त्यांची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना नॉनकोविड वॉर्डात हलविण्यात आले आहे.

लॉकडाऊनमध्ये पुन्हा वाढ?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या