वसमत : बंदोबस्तामुळे रक्षाबंधनासाठी ताईकडे जाता येत नाही अशी रुखरुख पोलीस दलात असतांना कनखर पोलीस अधिकारी असा लौकीक असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी पोलीस दलातील अधिकारी आणि शिपायांना राखी बांधत पोलीस दलाच्या ताई बनल्या आणि खाकीतील मानवतेचे दर्शन घडले.
कोरोना माहामारीमुळे सध्या सर्वच सण, उत्सवांवर निर्बंध घालण्यात आल्यामुळे सण आणि उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे. आज ३ ऑगस्ट रोजी भाऊ- बहिनीच्या नात्यातील गोडवा वृध्दींगत करणारा रक्षाबंधन अर्थात नारळी पौर्णिमा सण. या दिवशी बहीण आपल्या भावास दिर्घ आयुष्य लाभो अशी अपेक्षा व्यक्त करते व राखी बांधते तर भाऊ आपण जिवंत असेपर्यंत आपल्या बहिणीची रक्षा करण्याचे वचन देतो. हा उत्सव संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो.
पण सध्याच्या कोरोनाच्या जैविक संकटात घरोघरी बहिन आपल्या वाट पाहत होती. मात्र जिल्हातर्गत बससेवा सुरु असून अत्यावश्यक कारणासाठी ई-पास मिळत आहे. परिणामी बहिण भावाकडे राखी बांधायला जाऊ शकत नाही ना भाऊ बहिणीकडे पण येऊ शकत नाही आणि बंदोबस्ताच्या तणावामुळे पोलीसांना सारखे व्यस्त राहावे लागत आहे आणि आज तर रक्षाबंधन असतांना पोलीसांना आपल्या ताईची आठवण येत नसेल नवलच.
पण ही पोकळी भरुन काढत वसमत शहर पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीदेवी पाटील यांनी शहर पोलिस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचा-यांना राख्या बांधल्या आज पोलिस कर्मचा-यांना त्यांच्या बहिणीची जाणवणारी कमी पूर्ण केली. त्याबद्दल सर्वत्र पाटील यांचे कौतुक केले जात आहे.
Read More राम मंदिराचे भूमिपूजन टाळा; दिग्विजय सिंह यांची मागणी