22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeहिंगोलीहिंगोलीतील चार प्रभागात होणार आज अँटीजन टेस्ट

हिंगोलीतील चार प्रभागात होणार आज अँटीजन टेस्ट

एकमत ऑनलाईन

हिंगोली : शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी चार प्रभागात उद्या २३ जुलै रोजी सकाळी ८ वाजल्यापासून अ‍ँटीजन टेस्ट केली जाणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ़ अजय कुरवाडे यांनी दिली.

हिंगोली पालिकेत आज कोरोनाच्या वाढत्या प्रसारासंदर्भात उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली़ या बैठकीस नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, तहसीलदार गजानन शिंदे, नगरसेवक शेख निहाल भैय्या, माबुद बागवान, विशाल गोटरे, जावेद राज यांची उपस्थिती होती़ यावेळी बैठकीत कोरोनाचा प्रभाव वाढत असलेल्या तालाबकट्टा, आजम कॉलनी, पेन्शनपुरा, मंगळवाराभागात ही रॅपीड टेस्ट विनामुल्य केली जाणार आहे.

यासाठी महादेव माळीराम शाळा, राष्ट्रवादी भवन, बनावतवाला फंक्शन हॉल, ऩपा़ बालक मंदिरात शिबिर घेतले जाणार आहेत़ या शिबिरात नागरीकांची आरोग्य तपासणी केली जाणार असून यानंतर अवघ्या पंधरा मिनीटात अहवाल मिळणार आहे़ यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाय योजना करता येणार आहे.दरम्यान, शहरात चार प्रभागात होत असलेल्या रॅपीड टेस्टला नागरीकाकडून मात्र फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने नगर सेवकांच्या उपस्थितीतच जनजागृती केली जाणार आहे.

Read More  हिंगोलीत कंटेन्मेंट झोनच्या नियमाची ऐसीतैसी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या