34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeहिंगोलीसंचारबंदी शिथील होताच बाजारपेठ, बँकांत गर्दी!

संचारबंदी शिथील होताच बाजारपेठ, बँकांत गर्दी!

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्हा प्रशासनाने ८ मार्चपासून सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळात विविध आस्थापना, दुकाने, बँका, भाजीपाला मार्केट उघडण्यास परवानगी दिल्यानंतर सात दिवसांच्या संचारबंदीनंतर बाजारात विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती. यावेळी अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन झाल्याचे दिसत होते.

जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सात मार्चपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू केली होती. आठ मार्च रोजी दुध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, आस्थापना, दुकाने अत्यावश्यक वस्तुंची दुकाने, कृषी केंद्रे यांना अटी व शर्तीच्या आधारे आस्थापना खोलण्यास परवानगी दिली. सात दिवस संचारबंदी असल्यामुळे सर्वसामान्य व मध्यमवर्गीय नागरीकांनी भाजीमंडई, किराणा दुकान, फळ खरेदीसाठी मोठी गर्दी केली. तर राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांच्या समोर सकाळी १० वाजल्यापासूनच सेवानिवृत्त कर्मचारी, निराधार योजनेचे लाभार्थी तसेच पगारदार, नोकर आणि व्यापार्यांनी विविध कामांसाठी गर्दी केली होती.

काही बँकांच्या समोर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. त्याठिकाणी नागरीकांना रांगेत व शारिरीक अंतर ठेवून बँकेच्या कामकाजासाठी आत सोडण्यात येत होते. परंतू, काही बँकांच्या समोर सुरक्षा रक्षक असूनही नागरीक विनामास्क तसेच सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करीत असताना दिसत होते. येथील भाजीमंडईमध्ये सकाळी ग्रामीण भागातून बिटासाठी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला आला. त्याठिकाणीही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पहावयास मिळाले. तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या गहू, हरभरा, तूर ही धान्य मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणण्यात आली आहेत. या ठिकाणी बाजार समितीच्या वतीने कडक नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. परंतू, काही जण आदेशाचे उल्लंघन करीत असताना दिसत होते.

माहूर येथे विना परवानगी मिरवणूक ; गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या