24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeहिंगोलीअण्णाभाऊंना भारतरत्नच्या मागणीसाठी जलसमाधीचा प्रयत्न

अण्णाभाऊंना भारतरत्नच्या मागणीसाठी जलसमाधीचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

औंढा नागनाथ : सहित्यरत्न लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांना जनशताब्दी वर्षा निमित्त मरोनोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख किरण घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली औंढा तलाव येथे आज पदाधिका-यांनी जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मध्यस्तीने पदाधिका-यांनी माघार घेतली.

समाजसुधारक, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात करण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने औंढा तलावात जलसमाधी आंदोलन करून लक्ष वेधले. लोकशाहीरांचे साहित्य जगातील 27 भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे असे, यह आझादी झुठी है देश कि जनता भुकी है स्वातंत्रयाच्या दुस-याच दिवशी नारा देणारे सहित्यरत्न आण्णभाऊ साठे जनशताब्दी वर्ष साजरे करत असताना भारत सरकारने मरनोत्तर सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार द्येवून तमाम भारतियांच्या अपेक्षा पुर्ण कराव्यात हि मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्हाप्रमुख किरणभाऊ घोंगडे, आकाश सुतारे, गोरख खिल्लारे, मनोज मुळे,पंडित सर्यतळ, राज रणखांबे,क्रष्णा गायकवाड, यशवंतराव साळवे,प्रविण मुळे,बालाजी खंदारे, अविनाश मुळे,शुमम मुळे,सागर मुळे,करण्यात वाघमारे, विजय जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More  सुशांतसिंहच्या बहिणीने मोदींना केली न्यायाची मागणी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या