29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeहिंगोलीजि.प.अध्यक्षांना जिवे मारण्याचा प्रयत्न!

जि.प.अध्यक्षांना जिवे मारण्याचा प्रयत्न!

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्ह्यात दिवसेंदिवस वाळू माफियांची मुजोरी वाढू लागली असून, शुक्रवारी (दि.९) वाळू माफियांनी टिप्परने कारला धडक देवून जि.प.अध्यक्ष गणाजी बेले यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. वाळू माफिया एवढ्यावरच थांबले नाहीत तर कारला टिप्पर धडकविल्यानंतर लोखंडी सळई, लाठ्यांनी बेले यांना मारहाण केली. विशेष म्हणजे ही घटना तहसील आणि उपविभागीय कार्यालयासमोर घडली.

जि.प.अध्यक्ष गणाजी बेले यांनी दिलेल्या माहिती नुसार ते व चालक आपल्या शासकीय कारमधून ग्रामीण भागात गेले होते. ते हिंगोलीकडे परतत असताना त्यांची तहसील कार्यालयाजवळ आली असता वाळूमाफियांनी त्यांच्या कारला जोराची धडक दिली. त्यानंतर जखमी अवस्थेत गणाजी बेले व चालक कारबाहेर आले असता वाळू माफियांनी त्यांना शिवीगाळ करीत टॅमी व लाकडाने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याच अवस्थेत बेले यांनी जि.प.पदाधिका-यांसह पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होताच वाळू माफिया तेथून पसार झाले.

जि.प.उपाध्यक्ष मनिष आखरे यांच्यासह पदाधिकारी व पोलिसांनी जि.प.अध्यक्ष गणाजी बेले यांना शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या घटनेत शासकीय वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, बेले यांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेप्रकरणी सायंकाळी उशीरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

दरम्यान, जिल्ह्यात वाळू माफियांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली असून, अवैधरित्या वाळू उपसा रोखण्यात महसूल प्रशासनही अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. दिवसाकाठी लाखों रूपयांची वाळू उपसून एक प्रकारे शासनालाच चुना लावण्याचे काम सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने मुजोर वाळू माफियांचे चांगलेच फावले आहे.

संमतीशिवाय अमेरिकेची युद्धनौका भारतीय हद्दीत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या