बबन सुतार सेनगाव : बाळा तु निश्चीत बरी होशील घाबरु नको कसलीही अडचण असली तर थेट मला फोन कर असा धिर सेनगावातील कोव्हिड सेंटरमधील पाच वर्षीय चिमुकलीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिला. सेनगावातील कोरोना केअर सेंटरला काल जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी कोरोना बाधित रुग्णांसाठी ताब्यात घेतलेले तोष्णीवाल महाविद्यालयातील इंग्लिश स्कूल येथील कोरोला सेंटरला भेट दिली.
तेथील स्वच्छता गृह, स्रानगृह तालुका प्रशासनाकडून राबवित असलेल्या बाबीची तपासणी केली खुद्द जिल्हाधिकारी स्वच्छालय व स्रानगृह यांची पाहणी केली कोरोना सेंटरला तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरा लावून त्यांचे व्हिडिओ चित्र हे मोबाईल वरती प्रदर्शित झाले पाहिजेत यासह कोरोना बाधित रुग्णांसाठी स्वच्छ पाणी व चांगल्या दर्जाचे जेवण देण्याच्या सूचना अचानक भेट दिली. यावेळी तहसीलदार जीवक कुमार कांबळे, मुख्याधिकारी शैलेश फडसे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सचिन राठोड, नायब तहसीलदार वीरकुवर अण्णा यांची उपस्थिती होती.
कोव्हिड सेंटर मध्ये मुंबईहुन परतलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीची जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. जिल्हाधिका-यांच्या आपुलकीच्या भावनेने चिमुकलीचे पालक भावुक झाले. जिल्हाधिका-यांनी चिमुकलीला चौकशी करतांना येथे जेवन कसे मिळते, कोणत्या सुविधा मिळतात याबाबत विचारणा करीत काही अडचण असल्यास मला फोन लाव असे सांगितल्यांने अधिकारी अचंबीत झाले.
Read More केंद्र सरकारने एक ग्रॅमही दूध भुकटी आयात केलेली नाही-देवेंद्र फडणवीस