27 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home हिंगोली लॉकडाऊनचा निषेध करत प्रशासनाला पाठविला बांगड्यांचा आहेर

लॉकडाऊनचा निषेध करत प्रशासनाला पाठविला बांगड्यांचा आहेर

एकमत ऑनलाईन

हिंगोली : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने १४ दिवसाचा लॉकडाऊन जाहिर केला. यामुळे हातावर पोट असलेल्या गरीबांवर उपासमारीची वेळ आली असून लॉकडाऊन मागे घेण्याची मागणी करीत राज्य शासन व प्रशासनाला बांगड्यांचा आहेर दिला. लॉकडाऊन मागे न घेतल्यास स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांना ध्वजारोहनावर घेराव घालण्याचा इशारा विराट राष्ट्रीय लोकमंचचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी दिला आहे.

कोरोनाच्या जैविक संकटाने मागील चार महिने लॉकडाऊन सुरु होता. लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्राला कमी अधिक नुकसान सोसावे लागत आहे. लॉकडाऊन विसरुन अनलॉकचा विचार करु असे मुख्यमंत्री म्हणत आहेत. राज्यात अनलॉक तिनची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या प्रक्रियेमध्ये मुंबई, पुणे, नागपुर, औरंगाबाद, सोलापुर या सारखे गंभिर कोवीड १९ संदर्भात रुग्ण असतांना सुध्दा बाजारपेठा उघडण्यात येऊन लोकांचे जीवन सुरळीत करण्याकरिता व अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम शासन गंभीरतेने करीत आहे.

याउलट हिंगोली जिल्ह्यामध्ये कोवीड १९ संदर्भात वरील नमुद शहरापेक्षा अत्यंत चांगली परिस्थिती असतांना व महाराष्ट्रातील सर्वांत चांगला रिकवरी रेट असतांना जिल्हाधिकारी हिंगोली यांनी जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागामध्ये कडक लाॉकडाऊन करुन संचारबंदी लागु करुन सर्वसामान्य जनतेचे जीवन जगणे कठीण होत असून गोरगरीब लोकांवर उपासमारीची वेळ येत आहे. दुसरीकडे व्यापारी वाढीव दराने मालाची विक्री करुन कोट्यावधीचा उलाढाल करत नफा कमविला.

या कडक लाकडाऊनचे उद्देश व हेतु काय? जिल्ह्यामधील सर्व बँकेचे व्यवहार पुर्णपणे बंद करण्यात आलेले आहे.ज्या मुळे सर्व सामान्य जनता त्रस्त झालेली आहे. या कालावधीत फक्त खाजगी रुग्णालयास संलग्न असलेली औषधी दुकाने सुरु ठेवावी असे तुगलकी फर्मान मागे घेण्याची मागणी करीत शासनाच्या विरोधात घोषनाबाजी करण्यात आली.

जिल्ह्यातील नागरिकांपासून राजकीय नेते,पदाधिकारी दूर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,434FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या