23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeहिंगोलीहिंगोलीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सराफा असोसिएशनची २ ऑगस्टपासून बंदची हाक

हिंगोलीत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सराफा असोसिएशनची २ ऑगस्टपासून बंदची हाक

एकमत ऑनलाईन

हिंगोली : हिंगोली शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे़ कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सराफा असोसिएशनच्यावतीने शहरातील दुकाने २ ऑगस्टपासून ८ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

शहरातील कोरोनाचा संसर्गाच्या पार्श्वभुमिवर सराफा असोसिएशनचे आज बैठक घेण्यात आली़ या बैठकीस संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेशअप्पा सराफ, शहराध्यक्ष साईनाथ उदावंत, इंद्रचंद सोनी, बजरंग खर्जुले, शाम सूर्यवंशी, दुर्गादास खर्जुले, संदीप डहाळे, गणेश लोलगे, विनोद सूर्यवंशी, अजय शर्मा, आनंद कुल्थे, सुधीरअप्पा सराफ आदींची उपस्थिती होती़ यावेळी शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सूवर्णकार संघटनेच्या पदाधिका-यांनी आपली दुकाने बंद ठेवण्याची मागणी केली.

यावेळी एकमताने २ ऑगस्टपासून ९ ऑगस्टपर्यंत सराफा व्यवसायीकांनी आपली दुकाने बंद ठेवावीत असा निर्णय घेण्यात आला़ यावेळी आपली दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक नसल्याने एक सामाजिक दायित्व म्हणून सराफा व्यावसायीकांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रशासनाच्या उपक्रमाला साथ देण्याचे आवाहन करण्यात आले.

Read More  अभिनेत्री मयुरी देशमुखच्या नवऱ्याने गळफास लावून केली आत्महत्या

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या