21.2 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home हिंगोली केंद्र शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु

केंद्र शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु

मूग, उडीद खरेदीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन

एकमत ऑनलाईन

हिंगोली,दि.18 : केंद्र शासनाचे आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने खरीप हंगाम 2020-21 मध्ये मूग, उडीद हमीभाव खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र निश्चित करण्यात आले आहेत. या खरेदी केंद्राच्या ठिकाणी मूग, उडीद खरेदी करण्यासाठी दि. 15 सप्टेंबर, 2020 पासून नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. खरेदी केंद्राचे नाव, ठिकाण, केंद्र चालकाचे नाव व त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

प्रगती स्वयंरोजगार सेवा सह. संस्था, हिंगोली या केंद्राचा पत्ता जुने जिल्हा रुग्णालयाच्या समोर, तोफखाना, हिंगोली हे असून केंद्र चालकाचे नाव अमोल काकडे हे आहे व त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8788487580 असा आहे. कयाधू शेतकरी उत्पादक कं. मर्या. तोंडापूर ता. कळमनुरी या केंद्राचा पत्ता कळमनुरी हे असून केंद्र चालकाचे नाव महेंद्र माने असे आहे व त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9736449383 असा आहे. औंढा (ना.) तालुका सह. खरेदी विक्री संघ मर्या. औंढा (ना) या केंद्राचे ठिकाण जवळा बाजार हे असून केंद्र चालकाचे नाव कृष्णा हरणे हे आहे व त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 9175586758 असा आहे.

वसमत तालुका सह.खरेदी विक्री संघ मर्या. वसमत या केंद्राचा पत्ता मार्केट कमिटी, वसमत असा असून केंद्र चालकाचे नाव सागर इंगोले हे आहे व त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 8390995294 असा आहे. श्री संत भगवानबाबा स्वयंरोजगार सेवा संस्था कोथळज या केंद्राचा पत्ता तोष्णीवाल कॉलेजच्या समोर, साई जिनींग, हिंगोली रोड, सेनगाव असा असून केंद्र चालकाचे नाव संदीप काकडे हे आहे व त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7758040050 असा आहे. विजयालक्ष्मी बेरोजगार सह. संस्था मर्या कोळसा या केंद्राचा पत्ता साखरा ता. सेनगाव जि. हिंगोली असा असून केंद्र चालकाचे नाव माधव गाडे हे आहे व त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9423737672 असा आहे.

जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपल्या तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी संपर्क करुन नोंदणी करावी. नोंदणीसाठी खरी हंगाम 2020-21 मधील पिक पेरा नोंद असलेला तलाठ्याच्या सही शिक्यानिशीचा ऑनलाईन सातबारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबूक झेरॉक्स सोबत आणावे व बँक पासबूकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आयएफएससी कोड स्पष्ट असावा (जनधन बँक खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक देऊ नये). संबंधित तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी मूग, उडीद हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी, परभणी/हिंगोली यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या