22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeहिंगोलीवसमत रुग्णालयात ‘सिझेरियन’ महिलेचा मृत्यू

वसमत रुग्णालयात ‘सिझेरियन’ महिलेचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

वसमत : गरोदर मातेला प्रसूतीसाठी स्त्री रुग्णांलयात दाखल करण्यात आले होते़ सिझर झाल्यानंतर महिलेची प्रसूती झाली. अवघे पाच तासच तिच्या बाळाला तिची मायेची ऊब मिळाली. अन नंतर डॉक्टराने इंजेक्शन दिल्यानंतर अवघ्या पाच तासात मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना वसमत येथे घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणा मुळेच मातेचा मृत्यू झाल्याची आरोप नातेवाइकांनी केला आहे. डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाइकांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी धाव घेतली आहे.

गंगासागर भुजदास कांबळे वय २२ असे मयत महिलेचं नाव आहे. सदरील महिलेला प्रसूतीसाठी वसमत येथील रुग्णालयात ८ जून रोजी नातेवाईकांनी दाखल केले होते. मात्र सध्या स्त्रीरोग रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या गरोदर मातांची सिझर करूनच प्रसूती करण्यावर सर्वाधिक जास्त भर दिला जात आह़ तसाच प्रकार या महिलेच्या बाबतीतही घडला आहे. महिला पुत्ररत्न प्राप्त झाले़ जवळपास पाच तास महिलाही तिच्या बाळासोबत राहिली़ तिची प्रकृती देखील व्यवस्थित होती. ती सर्वा सोबत चांगली बोलत देखील होती.

Read More  जन्मल्यानंतर 20 मिनिटातच नाचू लागले हत्तीचे पिल्लू

साडे पाच तासानंतर अचानक तिच्या पोटामध्ये वेदना होत असल्याचे महिलेने सांगितल्यानंतर तिला डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिले. त्यामुळे काही क्षणातच त्या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेने सदरील महिलेचे नातेवाईक चांगलेच गोंधळून गेले. विशेष म्हणजे सदर महिलेला हे सरकारी रुग्णालयात दाखल केलेले असतानाही तिला शस्त्रक्रियेसाठी नातेवाईकामार्फत औषधी मागविण्यात आल्याची ही धक्कादायक बाब समोर आली आहे. गंगासागर चा रात्री बारा वाजता मृत्यू झाला होता़ मात्र मृतदेह रुग्णालयांच्यावतीने नातेवाईकांच्या ताब्यात देण्यासाठी विलंब केला जात होता. तिला ताप आल्याचे कारण डॉक्टराने देत स्वॅब घेण्यासाठी मृतदेह ठेवल्याचे डॉक्टरांच्या वतीने सांगितले जात होते. मात्र मृतदेह ताब्यात दिला जात नसल्याने नातेवाईक आक्रोश करत होते़ त्यामुळे रुग्णालयाचा परिसर दणाणून गेला होता.

शस्त्रक्रियेनंतर त्या महिलेला वाटू लागले अस्वस्थशस्त्रक्रिया झाल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे तिच्यावर डॉक्टर आणि योग्य ते उपचार केले़ तिला जास्त ताप आल्यामुळे कोरोना सारखे लक्षण जाणवू लागले. यामुळेच कदाचित मृत्यू झाला असावा. मात्र तिचा स्वाब हा प्रयोगशाळेकडे पाठविला असल्याचे वैद्यकीय अधिकारी यशवंत चव्हाण यांनी सांगितले.

अधिकारी आॅऊट आॅफ रेंज
शासकिय रुग्णालयाच्या आखत्यारीत येणाºया वसमतच्या महिला रुग्णालयात माता मृत्यूची घटना घडल्यानंतरही रुग्णालयाच्या अधिकाºयांचे भ्रमणध्वनी आऊटआॅफ रेंज होते. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास, महिला रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. महेश चव्हाण यांचे भ्रमणध्वनी आऊट आफ रेंज असल्याने आरोग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्­नचिन्ह निर्माण झाले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या