24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeहिंगोलीसरपंच निवडीवरून दोन गटांत तुफान हाणामारी

सरपंच निवडीवरून दोन गटांत तुफान हाणामारी

एकमत ऑनलाईन

४० जणांविरुध्द गुन्हा दाखल, ३ पोलिस जखमी
हिंगोली : ग्रामपंचायत निवडणुकीतील निकालानंतर हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोली निळोबा येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. रात्री उशिराची ही घटना आहे. निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागल्याने एक गट आक्रमक झाला. त्यानंतर दुस-या गटाकडूनही वादास सुरुवात झाली.

औंढा नागनाथ तालुक्यातील चिंचोळी निळोबा येथे ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यांसाठी निवडणूक झाली. यामध्ये दोन गटांचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सोमवारी औंढा तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. यामध्ये रवंदळे गटाचे ५, तर गरड गटाचे ४ सदस्य विजयी झाले. मात्र, सरपंचपदाच्या निवडीमध्ये गरड गटाचा उमेदवार विजयी झाला.

सदस्यांचे बहुमत एका गटाकडे तर थेट निवडीतून सरपंच दुस-या गटाचा झाल्याने घोषणाबाजीला सुरुवात झाली. दरम्यान, पोलिस निरीक्षक विश्­वनाथ झुंजारे यांनी गावात जाऊन मिरवणूक न काढण्याबाबत सूचना दिली. त्यानंतरही दोन्ही गटांनी मिरवणूक काढली. त्यातून दोन गट समोरासमोर आल्यानंतर चांगलाच राडा झाला.

दरम्यान, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर एका गटाने पोलिसांवरच दगडफेक केली. यामध्ये पोलिस कर्मचारी रवी इंगोले, वसीम पठाण, राजकुमार कुटे जखमी झाले. त्यानंतर वाढीव पोलिस कुमक मागविण्यात आली. या प्रकरणी ४० जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी मंगळवारी पहाटे औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या