Saturday, September 23, 2023

कारवाडी ग्रामपंचायतचे वादग्रस्त ग्रामसेवकाची बदली

हिंगोली : शहरालगत असणाºया कारवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक शिवाजी खरात यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागेवर ग्रामसेवक राजू भगत यांची नियुक्ती केल्याचे आदेश गट विकास अधिकारी मिंिलद पोहरे यांनी काढले आहेत.

हिंगोली शहरालगत असणारी कारवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक शिवाजी खरात यांनी विविध विकास कामांमध्ये अनियमितता व नियमबाह्य विकास कामे केल्याचा आरोप जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांनी केला होता. शिवाय खरात यांची बदली करण्यात यावी व चौकशी करण्यात यावी, याबाबतचे पत्र हिंगोली पंचायत समिती गटविकास अधिका-यांना दिले होते.

त्याच अनुषंगाने पंचायत समिती गट विकास अधिकारी मिलिंद पोहरे यांनी शिवाजी खरात यांच्या बदलीचे आदेश काढले असून त्यांच्या जागेवर ग्रामसेवक राजू भगत यांची नियुक्ती केली आहे. विशेष बाब म्हणजे खरात हे जवळपास सहा वर्षापासून याच ग्रामपंचायतचे कारभारी होते. पाच वर्षाच्या काळात सदर ग्रामपंचायत अंतर्गत विविध कामे करण्यावरून वाद निर्माण झाले होते. यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर चौकशी सुरू असल्याची चर्चा देखील होत आहे.

Read More  काटी येथे एकाच कुटूंबातील पाच रुग्ण आढळल्याने परिसर सील

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या