22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeहिंगोलीरक्षाबंधन सणावर कोरोनाचे सावट

रक्षाबंधन सणावर कोरोनाचे सावट

एकमत ऑनलाईन

हिंगोली : हिंदू प्रथा परंपरेत बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून रक्षाबंधन सणाकडे पाहिले जाते. राखीच्या रेशमी धाग्यात भाऊराया आपल्या बहिणीच्या संरक्षणासाठी वचनबध्द होतो. परंतू यंदा कोरोनाच्या जैविक संकटात हिंगोलीत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने रक्षा बंधन सणावर कोरोनाचे सावट स्पष्टपणे जाणवत आहे. दोन दिवसावर सण आले तरी बाजारपेठेत मात्र कोरोनाच्या भितीपोटी ग्राहक पाठ फिरवित आहेत.

मागील चार महिन्यापासून लॉकडाऊनमुळे बाजारपेठेत अनेक उद्योगांना, व्यावसायिकांना कोरोनाचा फटका बसला. अनलॉकमध्ये आता हळुहळू बाजारपेठ सुरळीत होत असतांना हिंगोलीत कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. या आठवड्यात तर कोरोनाचा उद्रेक पहावयास मिळाला. अशावेळी बाजारपेठ खुली असली तरी ग्राहक मात्र भिती पोटी बाहेर पडत नाही. परगावी वास्तव्याला असलेल्या भावाला पोस्टाद्वारे, कुरीअरद्वारे राखी पाठविण्यासाठी किमान आठवडाभर राखी खरेदीला सुरुवात होते.

या अनुषंगाने राखीतून व्यापार सावरेल या हेतुने काही व्यापा-यांनी लाखोंची गुंतवणुक केली. नानाविध प्रकारच्या राख्या खरेदी केल्या. बाजारपेठेत ठिकठिकाणी राख्यांची दुकाने सजविली जात आहेत. मात्र गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाची भिती हिंगोलीकरांना स्पष्टपणे जाणवत आहे. या भितीदायक वातावरणाचा परिणाम बाजारपेठेवर जाणवत असून सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाजारपेठ सुरु असली तरी ग्राहकी मात्र थंडावलेलीच आहे.

सोन्या-चांदीच्या राख्यांना तर मागणीच नाही
बाजारात हौसी कुटूंबात सोन्या-चांदीची राखी आवर्जून खरेदी केली जात असे. आता हा कल आणखी वाढत असल्याने सोन्या-चांदीच्या राख्यांना मागील काही वर्षापासून ब-यापैकी मागणी आहे. या मागणीच्या अनुषंगाने अतिशय कलाकुसरयुक्त आकर्षक राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांसाठी लाखो रुपयांची गुंतवणुक केली असतांना कोरोनाचा संसर्गाचा फटका सराफा व्यावसायीकांना बसत असल्याची माहिती सुप्रसिध्द सराफा विक्रेते सुधीरअप्पा सराफ यांनी दिली.

Read More  गुगल, अ‍ॅमेझॉन,अ‍ॅपल, फेसबूक Yelp सारख्या छोट्या फर्म्सचा कंटेन्ट चोरत असल्याचा आरोप

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या