Sunday, September 24, 2023

प्रशासकीय यंत्रनवेर कोरोना अटॅक!

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतांना कोरोनाने प्रशाकीय यंत्रनेवरच अटॅक केला आहे. झेडपीनंतर महसुल यंत्रनेतील बड्या अधिका-यास कोरोनाची लागण झाली आहे. परिणामी प्रशासनातील बहुतांश अधिकारी क्वारंटाईन झाली असल्याने खळबळ उडाली आहे.

कोरोनाच्या जैविक संकटाचा काही दिवसात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना वाढता प्रभाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा उशीरा का होईना झाली. उद्या ६ ऑगस्टपासून १९ ऑगस्टपर्यत संचारबंदीची घोषणा झाली. मात्र कठोर अमलबजावणी होण्याची तयारी सुरु असतांना आज बुधवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार महसूल विभागातील एक उच्चपदस्थ अधिकारी कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे. याव्यतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील एक वरिष्ठ वैद्यकीय अधिका-यासह एक आरोग्य परिचारिका व परिचारक असे बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

कोरोना विरोधातील लढ्यात यंत्रना सक्षम सांभाळणारे अधिकारीच आता कोरोनाचे लक्ष ठरत असल्याने यंत्रनेसमोरील अडचणी वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद प्रशासनातील उच्चपदस्थ पदाधिकारी कोरोना बाधित असल्याचे समोर आले होते. त्यापाठोपाठ कोरोनाचा आता महसूल विभागात शिरकाव झाला आहे. महसूल विभागातील एका अधिका-याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

सदर अधिका-याच्या संपर्कात आलेल्या इतर सतरा अधिका-यांचा अहवाल येणे प्रलंबित असून दोन दिवसांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात कार्यरत असणा-या एका वैद्यकीय अधिका-याच्या आईला कोरोनाची बाधा झाली होती. त्यापाठोपाठ आज झालेल्या अहवालानुसार सदर वैद्यकीय अधिकारी व त्याची पत्नी देखील कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. तर सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकीत्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी क्वारंटाईन झालेत. एक डॉक्टर सुट्टीवर आहेत. एक अनुभवी पॉझिटीव्ह, यामुळे आरोग्य यंत्रना कोरोनाने ग्रासली आहे.

यामुळे आता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर लॉकडाऊन कशा पध्दतीने केले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज रोजी हिंगोली जिल्ह्यामध्ये नव्याने २० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १२ रुग्ण हे रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे व ८ रुग्ण ईतर टेस्टद्वारे आढळून आले आहेत. ११ कोविड रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज पर्यंत हिंगोली जिल्हयात एकुण ७३८ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ५५० रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे व एकुन १८० रुग्णांवर उपचार चालु आहेत.

Read More  राम मंदिरात विद्युत रोषणाईने झगमगाट

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या