हिंगोली : दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोणाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून आज मिनी मंत्रालयातील दोघांना कोरोना ची लागण झाल्याचे वृत्त आहे़ दरम्यान मिनी मंत्रालयात करुणा पॉझिटिव्ह आढळल्याने मिनी मंत्रालयात खळबळ उडाली़ तातडीने दुपारी कामकाज बंद करत सॅनिटायझर फवारणी करण्यात आली़ दरम्यान या वृत्ताला सिइओ राधाविनोद शर्मा यांनी दुजोरा दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एक डॉक्टर कोरोना पॉझीटीव्ह आढळून आला आहे. सदरील डॉक्टर चार दिवसा पासून जिल्हा परिषद कामकाजात नाही. परंतु खबरदारी म्हणून आज आरोग्य विभागासह संपूर्ण जिल्हा परिषद इमारत खाली करून सॅनिटायझर फवारणी व संपूर्ण स्वच्छता करण्यात येत आहे. उद्या शनिवार व रविवारी सुट्टीत इमारत परिसर बंद ठेवण्यात येणार असे सिईओ शर्मा यांनी सांगितले.
तर या संदर्भात उपमुख्य कार्यकारी अधिकारी माळी यांनी म्हटले आहे की, आरोग्य विभागातील एक डॉक्टर कोरोना पॉझीटीव्ह आढळून आल्या नंतर जिल्हा परिषद मधील आरोग्य विभाग सुरूवातीला रिकामा करून सॅनिटायझर करून सिल करण्यात आला आहे. सदरील पॉझीटीव्ह रूग्णाच्या सानिध्यातील आलेल्या इतर कर्मचारी यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्याचे काम सुरू आहे. त्यांना त्यांचे स्वॅब नमुने येई पर्यंत क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषद परिसर सिल राहणार असून पॉझीटीव्ह रूग्ण संपर्कातील अधिकारी व कर्मचारी यांचे रिपोर्ट आल्यावर जिल्हा परिषद कामकाजा संदर्भात सांगता येईल असे माळी यांनी म्हटले आहे.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष मणिष आखरे यांनीही जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. आरोग्य विभागातील एक डॉक्टर कोरोना पॉझीटीव्ह आढळून आल्यामुळे जिल्हा परिषद शुक्रवारी दूपारी २ वाजता काही क्षणातच खाली करून जिल्हा परिषद प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यासाठी धावपळ सुरू केली होती.
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील कर्मचा-याचे स्वॅब तपासले जाणार
आरोग्य विभागातील एक डॉक्टर कोरोना पॉझीटीव्ह आढळून आल्या नंतर जिल्हा परिषद मधील आरोग्य विभाग सुरूवातीला रिकामा करून सॅनिटायझर करून सिल करण्यात आला आहे.
सदरील पॉझीटीव्ह रूग्नाच्या सानिध्यातील आलेल्या इतर कर्मचारी यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्याचे काम सुरू आहे. त्यांना त्यांचे स्वॅब नमुने येई पर्यंत क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच जिल्हा परिषद परिसर सिल राहणार असून
पॉझीटीव्ह रूग्ण संपर्कातील रूग्ण अधिकारी व कर्मचारी यांचे रिपोर्ट आल्यावर जिल्हा परिषद कामकाजा संदर्भात सांगता येईल असे माळी यांनी म्हटले आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष मणिष आखरे यांनीही जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने खबरदारी च्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
Read More सरकार पाडण्यासाठी भाजप नेत्यांनी 500 कोटी जमवले