31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeहिंगोलीहिंगोलीत रस्त्यावरून फिरणा-या रिकामटेकड्यांची कोविड चाचणी

हिंगोलीत रस्त्यावरून फिरणा-या रिकामटेकड्यांची कोविड चाचणी

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असून, दिवसेंदिवस रूग्णसंख्या आणि कोरोना बळीची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे सक्त आदेश असतानाही काहीजण मात्र त्या आदेशाकडे कानाडोळा करीत रस्त्याने फिरत आहेत. अशा नागरिकांची धरपकड करून दोन दिवसांपासून कोविड चाचणी करण्यात येत आहे. शनिवारीही रस्त्याने फिरणा-यांची कोविड चाचणी करण्यात आली.

हिंगोली शहरासह जिल्हाभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनीह्यावत:हून खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. परंतु, अनेकजण बेजबाबदारपणे वागत असल्याने कोरोनाचा फैलाव होवू लागला आहे. त्यामुळे कडक संचारबंदी करण्यात येत असून, त्या दृष्टीने प्रशासनाकडून पाऊले उचलली जात आहेत. नागरिकांनी स्वत: खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

लॉकडाऊनच्या पार्श्वभुमीवर अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना त्वरित मोफत धान्य वाटप करावे – पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या