30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeहिंगोलीसंचारबंदीने हिंगोली शहरात शुकशुकाट

संचारबंदीने हिंगोली शहरात शुकशुकाट

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सात दिवसाची संचारबंदी लागू केल्याने बुधवारी शहरातील रस्त्यावर शुकशुकाट होता. जागोजागी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. हिंगोली जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुस-यांदा संचारबंदी लागू केली आहे. त्याची कडक अमंलबजावणी केली जात आहे.

सोमवारी धुलीवंदन असताना सार्वजनिक ठिकाणी कोणीही रंग खेळला नाही. अनेकांनी कुटुंबियासमवेत कोरडा रंग लाऊन धुळवंड घरीच साजरी केली. तर बहुतांश जणांनी याकडे दुर्लक्ष करीत धुळवंड देखील साजरी केली नाही. संचारबंदी लागू झाल्याने ठिकठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक भागातून ये-जा करणा-या वाहनांची तपासणी करून बिनकामी फिरणारे व मास्क लावून न फिरणा-यांवर कारवाई करत वाहने जप्त करण्यात आली.

तर शहरातून जाणा-या अकोला- नांदेड मार्गावर नांदेड नाका, इंदिरा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, रिसाला नाका, अकोला बायपास, खटकाळी बायपास, महात्मा गांधी चौक आदी ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद होती. नेहमी वर्दळीच्या चौकाचौकात शुकशुकाट होता.

कोरोना महामारीत पैनगंगेतून रेतीचा अवैध उपसा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या