31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeहिंगोलीदांडीबहाद्दर ५ डॉक्टरासह ९ अधिका-यांना वेतनकपातीचा दणका

दांडीबहाद्दर ५ डॉक्टरासह ९ अधिका-यांना वेतनकपातीचा दणका

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाच्या काळातही गैरहजर आढळून आलेल्या ५ वैद्यकिय अधिका-यासह ९ जणांच्या वेतन कपातीचे आदेश जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी काढले आहेत. या शिवाय त्यांना तातडीने खुलासा सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

हिंगोली येथील शासकिय रुग्णालयाचा कारभार मागील काही दिवसांपासून अलबेल झाला होता. कोरोनाच्या काळात दिलेल्या कर्तव्यावर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्याकडे अनेकांनी कानाडोळा केला होता. तर काम करणा-या वैद्यकिय अधिका-यावरच कामाजा बोझा टाकला जाऊ लागला होता. या प्रकाराची माहिती उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांना मिळाल्यानंतर त्यांनीही या संदर्भात आरोग्य प्रशासनाकडे विचारणा केली होती.

त्यानंतर जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी सोमवारी १७ रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी उपस्थिती पटाचीही पाहणी केली. यामध्ये पाच वैद्यकिय अधिकारी व चार कर्मचारी गैरहजर असून त्यांची उपस्थिती पटावर स्वाक्षरी नसल्याचेही दिसून आले. त्यामुळे डॉ. श्रीवास यांनी वैद्यकिय अधिकारी डॉ. केदारनाथ रोडगे, डॉ. सोनी अग्रवाल, डॉ. संतोष नांदुरकर, डॉ. एस. एन. गिरी, डॉ. डोणेकर यांच्यासह योगाचार्य शुभांगी कदम, सुरेशनी ढवळे, सविता वाकळे, सुविधा खिल्लारे यांचे ज्या दिवशी उपस्थिती पटावर स्वाक्षरी नसेल त्या दिवसाचे वेतन कपातीचे आदेश काढले आहेत.

या शिवाय त्यांना गैरहजेरीबाबात खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खुलासा असमाधानकारक असेल तर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे त्यांना पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे.दरम्यान, उशीरा का होईना रुग्णालयाच्या अधिका-यांनी कारवाईचा बडगा उगारल्यामुळे रुग्णालयाचा कारभार सुधारण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

गंगाखेड नगर परिषदेतून सुट्टी घेवून ओएस सांभाळतात कृषी केंद्र

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या