23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeहिंगोलीहिंगोलीत कोरोनाचा धोका वाढला!

हिंगोलीत कोरोनाचा धोका वाढला!

एकमत ऑनलाईन

हिंगोली : जिल्ह्यात कोरोणाचा धोका अधिक वाढत असताना सारीच्या आजारामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. त्यातच आज दुपारी एका ६५ वर्षीय शहरातील रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

हिंगोलीतील एका खाजगी डॉक्टर त्यांचे २ कर्मचारी यांच्यासह ५ कोरोना बाधित काल सायंकाळी वाढले. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेत कोरोना बाधीत रुग्णांच्या उपचाराबाबत शंका घेतली जात होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल अचानक सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षास भेट देऊन कोरोणा बाधित रुग्णांशी संवाद साधला. आणि यानंतर आज कोरोना बाधीत रुग्णाचा मृत्यू झाला.

हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणूजन्य आजाराचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात उपचारासाठी दाखल असलेल्या पैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोणाचा संसर्ग अधिकच वाढत चालला असून प्रत्येक दिवशी बाधितांची संख्या वाढत चालली आहे. ३० जुलै रोजी मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील गवळीपुरा भागातील एका पंचवीस वर्षाच्या व्यक्तीला सामान्य रुग्णालयात २९ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास दाखल करण्यात आले असता अवघ्या काही मिनिटात त्याचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

त्याचप्रमाणे सामान्य रुग्णालयात व्हेंटिलेटर व बायपॅप मशीनवर उपचार चालू असलेल्या पैकी वसमत येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्यक्तींवर हिंगोलीतील कयाधू नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचप्रमाणे कळमनुरी तालुक्यातील एका १८ वर्षीय युवतीला जिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल केले असताना बापपॉप मशीन वर उपचार सुरू असताना तिचा देखील ३० जुलै रोजी मृत्यू झाला. यासंदर्भात जिल्हा रुग्णालय प्रशासनाने या तिघांचा मृत्यू सारी मुळे झाला असल्याचे सांगितले. गुरुवारी पाच कोरोना बाधित वाढले आहेत. आज दुपारी पुन्हा एका ६५ वर्षीय नागरीकांचा कोरोनामुळे उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

वसमतकरांची अ‍ॅन्टीजन्सी टेस्टकडे पाठ
हिंंगोलीतील शहरात अ‍ॅन्टीजन्सी टेस्टच्या माध्यमातुन कोरोनाचा स्पोट झाला. नागरीकांनी चांगला प्रतिसाद दिल्या नंतर असाच प्रयोग वसमत शहरात आज करण्यात आला.कंन्टेनमेंट झोन मध्ये चार ठिकाणी टेस्टची तयारी करण्यात आली होती. मात्र वसमतकरांनी अ‍ॅन्टीजन्सी टेस्टला पाठ दाखवीली. शहरात प्रशासनाकडुन आवहान केले तरी नागरीकांमध्ये टेस्टची भिती जाणवत होती. कोरोनाचे भय असलेतरी क्वारंटाईन सेंटरची भिती अधिक वाटत असल्याने अवध्या ७३ टेस्ट झाल्या यापैकी ८ पॉझिटीव्ह रुग्ण सापडल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली.

हिंगोलीकरांनो काळजी घ्या माझी प्रकृती उत्तम-हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर
हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांना कोरोनाची लागण झाली असून आपली प्रकृती उत्तम असून रुग्णालयात उत्तम दर्जाचे उपचार केले जात आहेत असे सांगत शहरातील नागरिकांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन आयसोलेशन कक्षातुन केले आहे.

हिंगोली शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. नगरपालिका प्रशासन जिल्हा प्रशासन नागरिकांच्या आरोग्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. मला कोरोणाचा प्रादूर्भाव झाला असला तरी मी मोठ्या शहरात आरोग्यसेवा घेण्याऐवजी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात आरोग्यसेवा घेण्याला प्राधान्य दिले आहे. मला हिंगोलीतील आरोग्य यंत्रनेवर विश्वास आहे.

हिंगोली सामान्य रुग्णालयातही अत्याधुनिक सुविधा मिळत आहेत. रुग्णालयात डॉक्टरांची अतिशय तत्पर सेवा दिली जात आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी वेळोवेळी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी करत आहेत. औषधोपचार बाबत कोणाचीही तक्रार असण्याचे कारण नाही. घरीच राहून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष बांगर यांनी केले आहे.

जिल्हाधिका-यांनी आयसोलेशन कक्षात भेट देऊन कोरोनाग्रस्तांना दिला धिर
हिंगोली शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असतांना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधीत रुग्णाची भेट घेत घाबरु नका धिर ठेवा आरोग्य यंत्रना आणी जिल्हाप्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे अशा शब्दात धिर दिला.

मागील काही दिवसापासुन कोरोनाच्या जैविक संकटात सोशल मिडीयावर उपचाराबाबत संशयकल्होळ निर्माण केला जात आहे. या पार्श्वभूमीवर काल रात्री जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सामान्य रुग्णालयात भेट दिली. रुग्णालयातील स्वच्छता तसेच आरोग्य सेवेचा आढावा घेतला. यावेळी रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णाशी संवाद साधला.

शासकीय रुग्णालयातील रुग्णांनी कुठल्याही परिस्थितीत उपचाराच्या बाबत कोणतीही शंका घेऊ नये प्रशासन पूर्णपणे रुग्णांच्या पाठीशी असून प्रत्येक रुग्णाची वैयक्तिक रित्या चौकशी करून त्यांच्यावर लक्ष दिले जात आहे. दररोज मी देखील उपचाराबाबत माहिती घेऊन याबाबतच्या सूचना देत असल्याचेही त्यांनी सांगितले. हिंगोलीतील लोकप्रतिनिधी देखील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील उपचार याबाबत कोणीही शंका घेण्याचे कारण नाही लोकांनी तसेच रुग्णांनी घाबरून न जाता हिम्मत ठेवावी तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी केले.

Read More  आमदार ज्ञानराज चौगुले कोरोना पॉझिटिव्ह

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या