30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeहिंगोलीकळमनुरीत गॅस सिलिंडरचा स्फोट; पाच जण जखमी

कळमनुरीत गॅस सिलिंडरचा स्फोट; पाच जण जखमी

एकमत ऑनलाईन

कळमनुरी : शहरातील आठवडी बाजार परिसरात घरात गॅस सिलेंडर लावताना लिकेज झाल्यामुळे रखरखत्या उन्हामुळे तप्त हवेने आगीचा भडका उडाला. या आगीत परिवाराचे ४ जण तर मदतीसाठी धावून आलेल्या शेजारचा युवक भाजला. या घटनेत घरातील सर्व साहित्य भस्मसात झाले असून, सुमारे पाच लाखावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

आठवडी बाजार परिसरात राहणारा राम भाऊ चापटे यांचा परिवार राहत असून कटलरी, मुलांचे खाऊ आदी विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात दि.३ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास गॅस सिलेंडर बदली करत असताना लिकेज झाला तसेच कडक उन्हा मुळे घरावरील पत्रे तप्त झाल्याने घराने आग धरली परिस्थिती बघता शेजारी राहणारा युवक शेख मेहराज शेख खलील हा मदती साठी धावून गेला व सिलेंडर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असताना आगी ने रुद्ररूप घेतले व या आगीत पाच ही जण सापडले यामुळे प्रसंगावधान साधत मेहराज यांनी परिवारास बाहेर काढण्यास आपली जीवाची पर्वा न करता मदत केली.

यामुळे वेळीच सर्व जण बाहेर पडले व जीवित हानी टळली या आगीत रामभाऊ चापटे (५०), संगीता चापटे (४०), मुलगा प्रणव चापटे (१५), वैष्णवी चापटे (१४) व शेख मेहराज शेख खलील (२०) हे भाजल्याने जखमी झाले. सर्व जखमींना कळमनुरी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर डॉ. बंड्रेवार यांनी उपचार केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले.

दरम्यान, घरास आग लागून उग्र रूप धारण केली असता आग विझवण्यासाठी सय्यद वाजेद अली, अफजल रहमान, वहिद पठाण, फारूक पठाण अयाज नाईक, उमर फारुख शेख, गफ्फार कुरेशी, मुजीब पठाण, मोबीन चौधरी, अकबर चाऊस, अकमल सिद्दीकी,अक्षय ढगे, नगर सेवक नाजीम रजवी, ऍड.इलियास नाईक,अ.समद लाला, हुमायून नाईक, शिवराज पाटील सुमित अलदुर्गे आदीसह नागरीकांनी जीवाची बाजी लावत आग विझवण्याचे काम केले तर घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंजित भोईटे, स.पो.उपनिरीक्षक रामचंद्र जाधव संजय राठोड, कांबळे मेजर,शिवाजी घोगरे तसेच नगराध्यक्ष उत्तमराव शिंदे घटनास्थळी हजर होत मोलाचे सहकार्य केले. कळमनुरी नगर पालिकेच्या अग्निशमन दलाचे पथक प्रमुख त्र्यंबक जाधव यांनी बंबा सह तत्काळ घटनास्थळी पोहचले यामुळे या भयानक आगी वर नियंत्रण मिळवले गेले.

इस्लापूर वनविभागाच्या जंगलाला आग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या