सेनगाव – येथील महादेव पांडुरंग धोत्रे या तरुण युवकावर चुकीचा उपचार केल्यामुळे त्याचा मृत्यु झाला असल्याचा आरोप नातेवाइकाकडून केल्या जात आहे त्या संबंधित डॉ.दांपत्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी मंगळवारी मयताच्या पित्याकडून सेनगाव पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
शहरातील पांडुरंग धोत्रे यांचा मुलगा महादेव धोत्रे हा आँक्टोंबर ता.१९ रोजी आजारी पडला होता. त्यानंतर रुग्ण महादेवची आई रुग्णां बरोबर डॉ. गोटे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी गेला व तेथील क्लिनिकमध्ये रुग्ण महादेव धोत्रे वर उपचार करून त्याला गोळ्या औषधे देऊन घरी पाठवण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ता.२० रोजी महादेव धोत्रे तब्येत जास्त खालावत असल्याने त्याला नातेवाईकांसह त्याच्या मित्र परिवाराने सकाळी तात्काळ डॉ. गोटे यांच्या दवाखान्यात दाखल करण्यासाठी आले असता त्यांचा दवाखाना बंद असल्याने त्यांच्या राहत्या घरी नेऊन दाखल करण्यात आले. यावेळी डॉ. गोटे यांनी महादेवला एक सलाईन मध्ये इंजेक्शन दिले. परंतु प्रकृतीवर कुठलाही परिणाम होत नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे डॉ. गोटे यांनी दवाखान्यात दाखल व्हायला सांगितले. व इथे देखील त्यांच्या पत्नीकडुन महादेवला पुन्हा एक सलाईन लावण्यात आले.
प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्याचा मित्र अमोल तिडके व गंगाराम फटांगळे यांनी डॉ.गोटे दांपत्याची भेट घेऊन महादेवच्या प्रकृतीत सुधारणा का होत नाही. त्याला पुढे हलवू का असे विचारले. तर डॉ.योगिता गोटे यांनी सांगितले की आमचे उपचार सुरु आहेत. त्यानंतर महादेवची प्रकृती अधिक खालावत जात असल्याचे डॉ. गोटे यांच्या लक्षात आले. त्यांनी महादेवच्या नातेवाईकांना हिंगोलीला घेऊन जाण्यास सांगितले. नातेवाईकांनी ॲम्बुलन्समध्ये घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यु झाला. यामुळे डॉ.गोटे यांनी चुकीचा उपचार करून जाणीवपूर्वक वेळ वाया घालवून महादेवच्या मृत्युला कारणीभूत डॉ.गोटे दांपत्य असल्याचा आरोप करीत त्यांच्यावर योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी महादेवच्या पित्यासह गांवकऱ्यांनी निवेदनाद्वारे सेनगाव पोलीस प्रशासनाकडे केली आहे. सेनगाव पोलीस प्रशासनाकडे राजकीय घाऱ्या सह युवा मित्र परिवार यांची उपस्थिती हे निवेदन देण्यात आले आहे
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची सायबर सेलकडे तक्रार