33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home हिंगोली प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा : पालकमंत्री वर्षा गायकवाड

प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा : पालकमंत्री वर्षा गायकवाड

एकमत ऑनलाईन

हिंगोली : कोरोनाशी लढा देताना शासकीय यंत्रणा कठोर मेहनत घेत आहेत. मात्र तरीही आता रुग्ण संख्या वाढीस लागली आहे.या परिस्थितीत नागरिकांनीही स्वयंशिस्त पाळणे अतिशय गरजेचे आहे. शासकीय यंत्रणांच्या सूचनांचा आदर करून जनतेने स्वत: व कुटुंबाच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन पालकमंत्री प्रा.वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचे संकट गंभीर वळणावर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी करणे टाळले पाहिजे.

मुळात अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेरच पडू नका. सर्वांनी एकत्रित व प्रामाणिक प्रयत्न केले तर कोरोना आटोक्यात येवू शकतो. हिंगोलीत अजूनही परिस्थिती चांगली आहे. मात्र ती हाताबाहेर न जाण्यासाठी शासन नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. परजिल्ह्यातून येणा-या प्रत्येकाने शासकीय क्वारंटाईन होणे गरजेचे आहे. शिवाय कोरोनासदृश्य लक्षणे दिसून येत असल्यास तातडीने नजीकच्या शासकीय संस्थेत दाखल व्हा. आरोग्य यंत्रणा आपल्या सोयीसाठी तत्पर असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले
.
कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजनेबाबत जिल्ह्यात विविध पथक नियुक्त करण्यात आले असून अडचण आल्यास त्यांच्याशी  संपर्क साधा. आवश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये़ आपणही दक्षता घ्या, इतरांनाही सुरक्षित करा, असे कळकळीचे आवाहन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.

Read More  भाग्यनगर भागातील रस्त्यांची दुरवस्था

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या