31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeहिंगोलीबाळापूरातून आयपीएल सट्टा लावणा-या चौघांना अटक

बाळापूरातून आयपीएल सट्टा लावणा-या चौघांना अटक

एकमत ऑनलाईन

आखाडा बाळापूर : सध्या आयपीएलचे सिजन सुरू झाले असून, ऑनलाईन सट्टा घेर्णा­यांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी आखाडा बाळापूर येथील राजर्षी शाहू विद्यालयाच्या मोकळ्या जागेत धाड टाकून ऑनलाईन आयपीएल सामन्यावर पैसे घेवून सट्टा लावर्णा­या व घेर्णा­यांवर कारवाई करत स्विप्ट डिझायर कारसह इतर साहित्य असा एकूण ७ लाख ८६ हजार १७५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आखाडा बाळापूरात आयपीएलवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे, बालाजी बोके, विलास सोनवणे, विठ्ठल कोळेकर, सुनील अंभोरे, राजूसिंग ठाकूर, विलास घोळवे, ज्ञानेश्­वर सावळे, किशोर सावंत, शंकर ठोंबरे यांच्या पथकाने राजर्षी शाहू विद्यालय व जिनिंग फेडरेशनच्या मोकळ्या जागेत लावण्यात आलेल्या स्विप्ट डिझायर कार एम.एच.१४ जी.एच.६४६२ या कारमध्ये मुंबई विरूद्ध केकेआर या ऑनलाईन आयपीएल सामन्यावर पैसे लावून सट्टा जुगार खेळताना व खेळविताना पवन कैलास आळणे, किशन श्रीराम कोकाटे, अनिल विश्­वनाथ पवार, विठ्ठल नामदेव पतंगे यांना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडून जुगार सहित्य, मोबाईल, सट्ट्याचे रेकार्ड व एक स्विप्ट डिझायर कार असा एकूण ७ लाख ८६ हजार १७५रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विलास सोनवणे यांच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या