22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeहिंगोलीसेनगाव तालुक्यात मोफत धान्य वाटपाचा बोजवारा; लाभार्थ्यांना केंद्राचे मोफत धान्य मिळालेच...

सेनगाव तालुक्यात मोफत धान्य वाटपाचा बोजवारा; लाभार्थ्यांना केंद्राचे मोफत धान्य मिळालेच नाही

एकमत ऑनलाईन

सेनगाव : कोरोना महामारीच्या काळात लागू करण्यात आलेली संचारबंदी या बंदी दरम्यान देशातील गोरगरीब सामान्य नागरिक धान्य विना उपाशी राहू नये यासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्या वेगवेगळ्या धान्य पुरवठा योजनेअंतर्गत मे महिन्यात शेतकरी प्राधान्य वगळता सर्वांना मोफत धान्य लाभ देण्याची आदेश असताना त्यातील अनेक स्वस्त दुकानदारांनी दैनंदिन योजनेतील म्हणजेच राज्य सरकारचे मोफत धान्य वाटण्यात धन्यता मानले असून केंद्र सरकारचे धान्य वाटलेच नसल्याने तालुक्यात मोफत धान्य वाटपाचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कोरोना महामारी काळात केंद्र सरकारकडून मे व जून महिन्याचे मोफत धान्य देण्याची घोषणा जाहीर करण्यात आली होती त्या अनुषंगाने केंद्राकडून मे महिन्याचे मोफत धान्य राज्यांना पाठविण्यात आले असून केंद्र सरकार अधिक राज्य सरकार यांच्या वेगवेगळ्या धान्य वाटप व तेही मोफत देण्याचे आदेश पारित करण्यात आले होते.

परंतु तालुक्यातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानदारांनी आपले नियमित वाटप होणारे धान्य मोफत वाटप करण्यात धन्यता मानली असून त्यांना पुनर केंद्र शासनाकडून प्राप्त झालेला मोफत धान्य साठा प्रतिव्यक्ती 5 कीलो त्यामध्ये 2 किलो तांदूळ 3 किलो गहू यांचा समावेश असून सुद्धा ते मोफत धान्य शेतकरी प्राधान्य कुटुंब वगळता अंतोदय योजना व राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप केले नसल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदार विरुद्ध लाभार्थ्यांची गैरसोय झाल्यानंतरही तक्रार करण्याचे धाडस होत नाही या बाबीचा फायदा दुकानदारांनी घेतल्याने गोरगरिबांच्या हक्काचे धान्य त्यांना मिळण्याऐवजी काळा बाजारात विक्री केली असल्याचा आरोप नागरिकातून होत आहे. केंद्र व राज्य सरकारकडून तालुक्यात मे महिन्याचा गहू व तांदूळ 12902 क्विंटल धान्य आले आहे त्यामध्ये केंद्र सरकारकडून गहु २८७९ क्वीटल गहू तर तांदूळ २५८६ क्वीटल तर राज्य सरकारकडून गहु ४५७१ क्वीटल व तांदूळ २८६६ क्वीटल मोफत धान्याचा समावेश आहे.

तालुक्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानदार ना शासनाकडून लाभार्थ्यांना मोफत वाटपासाठी आलेले धान्य प्रत्यक्षात पारदर्शक तेने वाटप झालेच नाही बहुतांश दुकानदारांनी एकवेळेचेच मोफत धान्य वाटप करण्यात तर उर्वरित केंद्राचे मोफत धान्य अखेर कुठे गायब झाले असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे कोरोना महामारी च्या काळात सुद्धा स्वस्त धान्य दुकानदाराकडून अशा प्रकारचे गंभीर पातक करण्याचे मनोदय असल्याने अनेक लाभार्थी धान्य विना वंचित राहात असल्याचा आरोप नागरिकातून व्यक्त केल्या जात आहे या गंभीर बाबीचा जिल्हाधिकारी यांनी योग्य ती चौकशी करून दोषी विरुद्ध कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

पात्र लाभार्थ्यांनी मे महिन्यातील केंद्र व राज्य सरकार यांचा मोफत धान्य लाभ घ्यावा-तहसीलदार जीवन कुमार कांबळे
तालुक्यातील अंतोदय योजना व राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील समाविष्ट असलेले लाभार्थ्यांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून दोन्ही धान्य मोफत प्राप्त झाले असून पात्र लाभार्थ्यांनी आपल्या हक्काच्या धन्याचा लाभ गावातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य उचल करून घ्यावा असे आवाहन तहसीलदार जीवंककुमार कांबळे यांनी केले आहे.

राज्य शासनाकडून नियमित योजना निहाय वाटप होणारे धान्य त्यामध्ये अंतोदय योजना व राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना या योजनेतील प्रत्येकी लाभार्थी 5 किलो धान्य मोफत असून त्यामध्ये 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ यांचा समावेश आहे व शेतकरी प्राधान्य कुटुंब वगळता सर्वच लाभार्थ्यांना मोफत धान्य प्राप्त असून त्यांचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा . मे महिन्यातील धान्य वाटपात तालुक्यातील कुठल्याही गावात अनियमितता आढळून आल्यास किंवा तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित दुकानदाराची चौकशी करून दोषी दुकानदारा विरुद्ध कारवाई करणार असल्याचे तहसीलदार कांबळे यांनी सांगितले. ज्या लाभार्थ्यांना आपले हक्काचे मोफत धान्य प्राप्त न झाल्यास त्यांनी पुरवठा विभागाकडे लेखी तक्रार देण्याच्या आवाहन तहसीलदार जीवककुमार कांबळे यांनी लाभार्थ्यांना केले आहे.

इटालियन नौदल अधिका-यावरील गुन्हे रद्द

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या