35.2 C
Latur
Monday, March 8, 2021
Home हिंगोली इतिहासात कोवीड लसीकरणाची सुवर्ण अक्षराने नोंद

इतिहासात कोवीड लसीकरणाची सुवर्ण अक्षराने नोंद

एकमत ऑनलाईन

हिंगोली : संपूर्ण जग हदरवून टाकणाऱ्या कोरोना संसर्गावर लस उपलब्ध झाली असून, पहिल्याच टप्प्यात हिंगोली जिल्ह्यासाठी ६ हजार ६५० डोस उपलब्ध झाले आहेत. शनिवारी प्रत्यक्ष लसीकरणाला सुरूवात झाली. एकाच दिवशी २०० कर्मचाऱ्यांना लसीचा डोस देण्यात आला असून, कोव्हीड-१९ लसीकरणाची जिल्ह्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद घेण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील शासकीय परिचारिका महाविद्यालयात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते कोव्हिड-१९ लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा बिनोद शर्मा, पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. राहुल गित्ते, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, जिल्हा लसिकरण अधिकारी, डॉ. प्रेमकुमार ढोंबरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश टेहरे तालुक आरोग्य अधिकारी डॉ. सतिश रुनवाल, डॉ. नामदेव कोरडे, यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी जयवंशी यावेही म्हणाले की, जिल्ह्यात कोव्हिड-१९ या प्रादूर्भावाबाबत हिंगोली जिल्हात सर्वप्रथम १४ फेब्रुवारी, २०२० रोजी जनजागृतीपर सभा घेण्यात आली. या सभेत कोव्हिड-१९ या साथरोगाला लढा देण्यासाठी रणनीती तयार करण्यात आली. या रणनितीचा आजचा पुढचा टप्पा म्हणजे ही लसीकरण मोहिम असून प्रशासनाने योग्यनियोजन करुन आखलेली रणनीती यशस्वी होतांना दिसत असल्याने समाधान लाभत आहे.

जिल्ह्यात कोव्हिड-१९ या साथरोगाविरुध लढा देतांना प्रत्येक विभागाचे योगदान हे खुप मौल्यवान असून आरोग्य विभागाने स्वत:चा जीव धोक्यात घालून दिवस-रात्र मेहनत केली. त्यांचे योगदान हे अमुल्य आहे. त्यामुळेच आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करुन या लसीकरण मोहिमेची सुरुवात करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील शासकीय व खाजगी आरोग्य कर्मचा-यांचा समान समावेश या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यावेळी म्हणाले. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी लसीकरण मोहिमेची माहिती देतांना म्हणाले की, जिल्ह्यात लसीकरणाबाबतचे सुक्ष्म व योग्य नियोजन करण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यास एकूण ६ हजार ६५० लसींचे डोस प्राप्त झाले असून याद्वारे एकूण ३ हजार ३३२ ‘कोव्हिन अपवर नोंद केलेल्यांना पहिल्या टप्पयात लसीकरण करण्यात येणार आहे. हिंगोली जिल्हा रुग्णालयातील शासकीय परिचारीका महाविद्यायात आयोजित आरोग्य विभागातील १०० कर्मचारी तर उपजिल्हा रुग्णालय, कळमनुरी येथे आयोजित आरोग्य विभागातील १०० कर्मचारी असे एकुण २०० आरोग्य कर्मचा-यांना आज लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लसीकरणाविषयी कसलिही भिती न बाळगता लसीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन ही यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले.

प्रारंभी प्रास्ताविकात निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी लसीकरण मोहिमे विषयी म्हणाले प्रथम कोव्हिड-१९ लसीकरण पुर्व तपासणी कक्ष, त्यानंतर नोंदणी कक्ष, प्रत्यक्षात लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्ष या प्रमाणे विविध कक्ष स्थापन करण्यात आले आहे सांगितले. जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करुन देशवासियांना संबोधित केल्यानंतर जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कोव्हिड-१९ लसीकरण मोहिमेची प्रथम लस वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक मोरे यांना देण्यात आली. तर शासकीय परिचारिका महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती रमा गिरी यांना प्रथामिक स्वरुपात दुसरी तर महिलांमध्ये प्रथम लस देण्यात आली. लसीकरणाचे पहिले लाभार्थी वैद्यकीय अधिकारी डॉ. दिपक मोरे यांनीयावेळी लस घेतल्यानंतर कुठलाही त्रास झाला नसून स्वत:ला स्वरंक्षीत वाटत असुन सर्वांनी ही लस घेवून स्वत: आणि इतरांना संरक्षीत करावे असे आवाहन केले.

कळमनुरीत करोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात
गेल्या अनेक महिन्यापासून चर्चेत असलेली कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून येथील उपजिल्हा रुग्णालयात १६ जानेवारी रोजी एकूण १०० आरोग्य कर्मचा-यांना लस देण्यात आली. लसीकरणाची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात झाली. उद्घाटन तहसीलदार दत्तू शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.शेख रौफ, पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांची उपस्थिती होती. सदरील लसीकरणाची सुरुवात वैद्यकीय अधीक्षक डॉ.आनंद मेने यांना प्रथम लस देऊन करण्यात आली त्यानंतर इतर आरोग्य कर्मचा-यांना देण्यात आली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या