16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeहिंगोलीअवैधरित्या कत्तलीसाठी नेणाऱ्या 21 जनावराची गोरेगाव पोलिसांकडून सुटका

अवैधरित्या कत्तलीसाठी नेणाऱ्या 21 जनावराची गोरेगाव पोलिसांकडून सुटका

एकमत ऑनलाईन

सेनगाव( बबन सुतार) : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीत गुप्त बातमीदारांच्या आधारे हद्दीतून चार टेम्पो मधून अनेक जनावरे अवैधरित्या कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती आधारे गोरेगाव पोलिसांनी भल्या पहाटे सापळा रचून चार टेम्पो व त्यांचे चालक यासह 21 जनावराना ताब्यात घेऊन 21 जनावरांना जीवदान देण्याची घटना घडली आहे.

गोरेगाव ठाण्याच्या पथकाने हि दबंग कारवाई केली आणि सुमारे २१ बैल कतली पासून त्याना जिवदान देण्यात यश आलं आहे . वरीष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मध्यरात्रीनंतर आज भल्या रात्री अंदाज ३ वाजता पासून मिळालेल्या माहितीनुसार गोरेगाव पोलिसांनी सापळा रचून पाच वाजेच्या सुमारास ही कारवाई केली आहे. गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील गोरेगाव नजीक चौफुलीवर पाटील यांच्या पथकाने दोन टेम्पो पकडले आहेत. पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांनी सुद्धा पथकं कर्मचारी घेऊन वाशिम ते हिंगोली महामार्गावर कनेरगाव नाका येथे तळं ठोकून तैनात होते पोलिसचौकी पासून काही अंतरावर दोन टेम्पो हे जनावरांना हिंगोली कडे जाणारे दोन पिक अप पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

या टेम्पो मध्ये अत्यंत निर्दयीपणे कोंबून असलेले तब्बल एकवीस बैल आढळून आले आहेत. यापैकी अनेक बैल हे जखमी झालेल्या अवस्थेत आठळले आहे त हि जनावरे कत्तलीसाठी जात असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार हे दोन पिक अप ज्याचा नंबर एम एच 29 बी इ झिरो 31 तर दुसरा पिकप एम एच 37 टी ३५७ पिक अप क्रमांक एम एच 37 जे 10:27 असून असून पिकप क्रमांक चार एम एस 37 जे 14 50 असे एकूण चार पिकअप तयापैकी दोन काजळेशवर ता कांरजा जिल्हा वाशिम येथील रियाज अहेमद अबदूल नबी, आणि अब्दुल रफिक शेख लाल रा काजळेशवर ता कारंजा जिल्हा वाशिम हे दोघे जण काजळे शवर वरुन हिंगोली जिल्ह्यातील पुसेगाव येथे नेत असताना पकडण्यात आले आहे असे पोलीसांनी माहिती दिली तर दोघेजण मंगरुळपीर तालुक्यातील अकील जावेद मोहम्मद जिया व अब्दुल संजीद शेख उमर रा मणभा कारंजा येथील रहिवासी असलेल्या यांनी हि जनावरे कतली साठी हिंगोली येथे नेताना मोठ्या सिताफिने पकडून गोरेगाव पोलिस ठाण्यात आणले व त्या २१ बैलांना मोकळे करून त्यांना जिवदान देण्यात आले आहे.

असुन अधिक तपास करत आहेत. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, हिंगोली ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील व पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांच्या पथकांनी ही कारवाई केली आहे कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार असून जनावरांना कतली साठी नेणारया मुख्य सुत्रधार कोण याचा शोध घेतला जाणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील मॅडम व पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांनी सांगितले आहे गावातील नागरिकांनी जनावरांना बघुन त्या भुकेनं हापालेलया बैलांना चारा आणण्यासाठी गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील व पोलीस उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांच्या पथकाने ही चारापाणी देऊन एक आगळावेगळा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला.

या कारवाई बदल गोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत नागरिक आनंद व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहेत अशाच कारवाया सुरू राहीलया पाहिजे अशी मागणी होत आहे.यावेळी उपनिरीक्षक बाबुराव जाधव यांनी नागरीकांना आव्हान करण्यात आले आहे की जर कोणत्याही शेतकऱ्यांची बैल चोरी तक्रारी असतील तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ गोरेगाव येथील पोलिस ठाण्याच्या कर्मचारी यांच्यासी संपर्क साधावा असे आवाहन जाधव व पाटील यांनी केले आहे यावेळी या पथकात पोहे का. जगन गायकवाड, पोलीस शिपाई इम्रान पठाण , पोलीस शिपाई राजू हमने ,होमगार्ड दिलीप खिलारी, पो हे श्याम उजगरे, पोलीस शिपाई विजय महाले ,यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांनी कामगिरी बजावली.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या