हिंगोली : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी आज औंढा तालुक्यातील येहळेगाव (सोळंके) गावातील अतिवृष्टीग्रस्त शेत-शिवाराची पाहणी केली.
यावेळी पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या शेतक-यांशी संवाद साधुन संबंधित विभागास बाधित शेतक-यांना तात्काळ मदत देण्याच्या सूचना दिल्या. यावेळी आ. राजु नवघरे, सरपंच श्रीमती सुनंदाबाई भिमराव सोळंके, अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजय लोखंडे यांच्यासह गावातील ग्रामस्थांची उपस्थिती होते. यावेळी पालकमंत्री गायकवाड यांनी विविध भागात भेटी देवून पाहणी केली.
भारत मदतीसाठी धावला : हवाई दलाच्या विमानाने बैरुतला पाठवली मदत